मानेवाडी येथे फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटण मधील RHWE मधील उद्यानदुत ओंकार डोंबाळे,गणेश करे, प्रज्वल क्षिरसागर,सौरभ कोकरे,उदय मोहिते,प्रज्वल यादव यांच्या मार्फत ग्रामीण जागरूकता कार्यानुभव व डृोन द्वारे फवारणी याचे शेतकरी बांधवांना प्रशिक्षण देण्यात आले ड्रोन द्वारे फवारणी कशी करावी व त्याचे होणारे फायदे,फवारणी खर्चात होणारी बचत,याबाबत उपस्थित शेतकरी बांधवांना प्रशिक्षण देण्यात आले.प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. शेतकरी यांना याबाबत माहिती मिळाल्याने समाधान व्यक्त केले. या बरोबरच उदयानदूत यांनी विविध उपक्रमाची माहीती ही देण्यात आली. यावेळी उपस्थित मा. सरपंच नामदेव जाधव,मा.उपसरपंच , प्रेमीलाताई हायस्कूल चे प्रा.खराडे सर ,ग्रामपंचायत सदस्य , ग्रामसेवक बोराटे ,माजी सरपंच, उपसरपंच तसेच कृषी सहाय्यक विनोद निंबाळकर उपस्थित होते.सर्वांचे आभार मानुन प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला.श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.डी. निंबाळकर व कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.यु.डी. चव्हाण, कार्यक्रम समन्वयक प्रा.लेंभे, प्रा. पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.
शिवाजीराजे उद्यानविद्याच्या विद्यार्थ्यांनी डृोन द्वारे फवारणीचे शेतकरी बांधवांना दिले प्रशिक्षण
फलटण टुडे (मानेवाडी ) :-