अनिल कोरवी, श्रेया पाटोळे, आदर्श यादव, आरुषी गुप्ता व सोनू यादव यांची सुवर्ण धाव
लंगडीत पार्ले टिळक विद्यालय, एम. पी. एस. विद्यालय, जिजामाता स्पो. क्लब, एम. डी. शहा महिला महाविद्यालय विजेते
फलटण टुडे मुंबई, :-
मुंबई शहर व मुंबई उपनगरात श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेचा थरार सुरु असून आज पावन खिंड दौड (मॅरेथॉन) स्पर्धा सकाळी ८ वा संजय गांधी उदयान बोरीवली येथे आयोजित केली होती. ७ कि मी धावण्याच्या या स्पर्धेत खेळाडूंची वेगवेगळ्या वयोगटात विभागणी केली होती.
या स्पर्धेत १६ वर्षाखालील मुले व मुली, १९ वर्षाखालील मुले व मुली, व २० ते ४५ मुले व मुलींनी भाग घेतला होता. या सर्वही गटात मुंबईकरांनी भरभरून प्रतिसाद दिला होता व या स्पर्धेत तब्बल १२३० खेळाडूंनी भाग घेतला होता. या स्पर्धेत विजयी प्रथम चार क्रमांक पुढील प्रमाणे आहेत. प्रथम क्रमांकाला रोख रु. ३०००/- व चषक, द्वितीय क्रमांकाला रोख रु. २०००/- व चषक, तृतीय क्रमांकाला रोख रु. १०००/- व चषक व उत्तेजनार्थ खेळाडूला रोख रु ५००/- देऊन गौरवण्यात आले.
गट प्रथम दितीय तृतीय उत्तेजनार्थ
१६ वर्षाखालील मुले सोनू यादव अभय पाटील अजित बिंद सुजित बिंद
१६ वर्षाखालील मुली आरुषी गुप्ता मुस्कान शेख प्रीशा गुप्ता स्वरा शिंदे
१९ वर्षाखालील मुले आदर्श यादव विशाल कनोजिया शिवम पाल विशाल यादव
१९ वर्षाखालील मुली श्रेया पाटोळे सोनाली गुप्ता काजल पाशी अंजली सिंग
२० ते ४५ वयोगट अनिल कोरवी प्रशांत जाधव सत्यम विश्वकर्मा सागर शुक्ला
या स्पर्धेचे उदघाटन खासदार गोपाळ शेट्टी यांनी केले. स्पर्धेचा बक्षीस समारंभ बृहन मुंबई महानगर पालीकेचे शिक्षणाधिकारी श्री राजेश.कंकाळ व उपशिक्षणाधिकारी श्रीमती सुजता खरे यांच्या हस्ते पार पडला. खेळाडूंना यांना रोख बक्षीस प्रमाण पत्र व चषक देऊन गौरवण्यात आले.
अंधेरी तालुक्यातील लंगडीची स्पर्धा संत रामदास क्रीडांगण, अंधेरी येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलांच्या गटात पार्ले टिळक विद्यालयाने रामेश्वर विद्यालयला हरवले तर मुलींच्या गटात एम. पी. एस. विद्यालयाने फारूक हयास्कुलला पराभूत केले, १७ वर्षाखालील मुलांच्या व मुलींच्या दोन्ही गटात जिजामाता स्पो. क्लबने पार्ले टिळक विद्यालयाच्या दोन्ही संघांना पराभवाची धूळ चारली. तर पुरुषांच्या खुल्या गटात जिजामाता स्पो. क्लब व महिलांच्या खुल्या गटात श्री. एम. डी. शहा महिला महाविद्यालयाने विजेतेपद पटकावले. हि स्पर्धा जयवंत बोभाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केली होती व हन मुंबई महानगर पालीकेचे विश्वनाथ गदारी यांनी स्पर्धेवर निरक्षक म्हणून कामकाज पहिले.