फलटण टुडे (मुंबई, दि. 27 ) :-
जानेवारी, दादरच्या अमर हिंद मंडळाची डायनॅमिक खो-खो लीग स्पर्धेचे आयोजन २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत केले आहे. अमर हिंद मंडळाची हि पहिलीच खो-खो लीग आहे. मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतने व त्यांच्या नियमानुसार हि स्पर्धा होणार आहे.
सात मिनिटाची एक इनिंग असून सात खेळाडू यात खेळणार आहेत तर संरक्षणासाठी ९ खेळाडू असतील. लिलाव पद्धतीने सहा संघ निवडण्यात आले असून सहभागी संघ व त्यांचे मालक पुढील प्रमाणे आहेत. माटुंगा फायटर्स (आदित्य गंधेकर), वरळी फिनिशर्स (अरुण देशमुख), दादर पँथर्स(भाग्यश्री सावंत), परेल रुद्रास (राजेश पाडावे), लालबाग स्पार्टन्स (गौरी पाटील), माहीम वॉरियर्स (बाळ तोरसकर). मुंबईतील सर्व खेळाडूना यात सहभागी करण्यात आले असून संघातील सर्व खेळाडू समान दर्जाचे आहेत.
असे आहेत संघ व त्याचे प्रशिक्षक टीम ए: माटुंगा फायटर्स : प्रसाद राडिये (कर्णधार), प्रशिक मोरे, सुजय मोरे, गणेश शाहू, वरुण पाटील, पवन नाचणेकर, सुहिल धांभेकर, शुभम कांबळे, भूपेश गायकवाड, प्रसाद भाटकर, सुबोध पाटील, शुभम शिंदे, नितीन करोटिया, अभय कदम, विकास कारंडे (प्रशिक्षक).
टीम बी : वरळी फिनिशर्स : वेदांत देसाई (कर्णधार), नीरव पाटील, अजय मित्रा, विशाल खाके, सूरज पाल, आदेश पाडवे, जयेश नार्वेकर, सनी टेंबे, विनय परीट, नितेश अस्तमकर, स्वयंम साळवी, विपूल लाड, रुपेश शेलटकर (प्रशिक्षक)
टीम सी : दादर पँथर्स : आदेश कागडा (कर्णधार), जीतेश नेवळकर, चैतन्य धुलप, किरण कर्णवार, प्रतीक होडावाडेकर, सिद्धार्थ कोळी, रोहित जावळे, मयूर मार्गज, जतीन गावकर, प्रतीक इंदुलकर, प्रतीक घाणेकर, ओंकार गवळी, सूरज वैश्य, नीलेश सावंत (प्रशिक्षक).
टीम डी : परेल रुद्रासः पियुष घोलम (कर्णधार), हितेश आग्रे, किरण गारोळे, तेजस संगरे, रोहित परब, आशुतोष शिंदे, सूरज खाके, विश्वनाथ सुतार, आदित्य टेमकर, रोहन जाधव, साई टेंबूरकर, यश कबळे, अक्षय दहिंबेकर, श्रीकांत गायकवाड (प्रशिक्षक).
टीम ई : लालबाग स्पार्टन्स : श्रेयस राऊळ (कर्णधार), विराज कोथमकर, श्रीकांत वल्लाकाठी, हर्श कामटेकर, आत्माराम पालव, अनिकेत परमार, पियुष काडगे, सनाजी कांगुटकर, वीतेश काटे, हर्शल राऊत, तन्मय पवार, प्रणय प्रधान, गौरव कुडव, पवन घाग (प्रशिक्षक).
टीम एफ : माहीम वॉरियर्स : आयुष गौरव (कर्णधार), रोहन टेमकर, ओंकार मिरगल, सिद्धेश चोरगे, अनिकेत आदरकर, कुशाल शिंदे, जनार्दन सावंत, विशाल सुतार, सतीश गुलंबे, अनंत चव्हाण, ओम वटणे, ओम भारणकर, साद्विक भगत, सुधाकर राऊळ (प्रशिक्षक).