फलटण टुडे ( फलटण दि 26 ) :-
शुक्रवार दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी प्राथमिक विद्यामंदिरमध्ये आपल्या भारत देशाचा 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या दिमाखात व आनंदात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर फलटण शाळा समिती सदस्य श्री.शिरीष शरदकुमार दोशी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहन करण्यात आले त्यावेळी(शाळा समिती निमंत्रित सदस्या)श्रीमती निर्मला रणवरे,प्रशासन अधिकारी श्री.अरविंद निकम तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.रुपेश शिंदे उपस्थित होते व नविन प्राथमिकच्या मुख्याध्यापिका,मुधोजी बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका व नवीन बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका उपस्थित होत्या त्यावेळी प्रथम ध्वजारोहन,राष्ट्रीय सलामी, राष्ट्रगीत,ध्वज प्रतिज्ञा, ध्वजगीत,संविधान,महाराष्ट्र गीत, गुणवंत विद्यार्थ्यांचा व मैदानी स्पर्धा गाजवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला
तसेच इयत्ता पहिली व दुसरीच्या बालकलाकारांनी देशभक्तीपर विविध गीतांवरती नृत्यात्मक कवायत प्रकार व देशभक्तीपर आकर्षक नृत्य सादर केली व उपस्थित सर्व प्रेक्षकांची मने जिंकून घेतली त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले अशा प्रकारे आनंद उत्साह व भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!वंदे मातरम!भारत माता की जय! या जयघोषामध्ये 75 वा प्रजासत्ताक दिन आनंदात साजरा करण्यात आला.