अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा मोनिता सोसायटीत विविध कार्यक्रमाने साजरा

फलटण टुडे वृत्तसेवा :-
मोनीता विश्वगृहनिर्माण सोसायटी लक्ष्मीनगर फलटण येथे अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

यावेळी सोसायटीस आकर्षक विद्युत रोषणाई व सजावट करण्यात आली
 होती. सकाळी ९ : ३० वा. सर्व पुरुष
माहिल व अबालवृद्ध यांनी एकत्र येवून श्रीरामाची आरती केली व त्यानंतर पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी श्री रामाचा नाम घोषाने सर्व परिसर दुमदुमून गेला .


त्याननेर सायंकाळी ४:०० वा .सोसायटीच्या महिला मंडळाकडून हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी महिलांनी सुमधूर स्वरात रामगीतांचे विविध गाण्यांचे गायन केले . यावेळी लहान मुलांनी राम , सिता , लक्ष्मण , रावण यांच्या वेशभूषा करून रामायनातील छोटीशी नाटीका सादर करून आपल्या कलाकारीने जमलेल्या सोसायटीतील लोकांकडून वाहवा मिळवीली .

यावेळी रात्री ७ ते ९वाजेपर्यंत फलटण तालुक्यातील नाईकबोमवाडी येथील भजनी मंडळानेसुंदर अशा भजनाने श्रोते वर्गाला मंत्रमुग्ध केले व तदनंतर सोसायटीच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले होतेया कामे सोसायटीतील महिला , पुरुष व लहान मुले यांनी सुंदर नियोजन करून कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मोलाचा हातभार लावला व कार्यक्रम यशस्वी पार पाडला .

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!