फलटण टुडे (बारामती ): –
रविवार २२ जानेवारी रोजी आपटे सभागृह डेक्कन पुणे येथे वालचंद नगर पोस्ट कॉलनी येथील माजी रहिवासी जे पूर्वी ई टाईप ,डी टाईप, व पी टाईप या कॉलनी मधील
माजी अधिकारी ,कर्मचारी यांच्या कुटूंबियांचा मेळावा संपन्न झाला.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि ज्येष्ठ व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.
वालचंद नगर कंपनी मुळे इंदापूर तालुक्याला जागतिक ओळख निर्माण झाली व कर्मचाऱ्यांची मुले शिकली, प्रगती झाली व विविध क्षेत्रात चमकली आशा प्रकारे जुन्या आठवणींना उजाळा दिला व अनुभव कथन केले.
कार्यक्रमाचे संयोजन विनायक जलवादी ,शिरीष चोपडे ,दीपक करंदीकर ,आशिष शेटे ,गिरीश चोपडे आणि पुष्कर गायधनी यांनी केले होते. तर सूत्रसंचालन नितीन करंदीकर यांनी केले. अशा प्रकारचे गेट-टुगेदर नेहमीच व्हावे. व एक वर्षाचा एनर्जी बल औषध प्रत्येकाला मिळावे. असे ज्येष्ठ नागरिकांनी अपेक्षा व्यक्त केली.