फलटण टुडे ( सातारा दि. २४ ) :-
जिल्हा क्रीडा परिषद, सांगली द्वारा विभागस्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेचे (14 वर्षे मुले) यांच्या आयोजनात करण्यात आली होती यामधे 14 वर्षाखालील तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत व जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये आपल्या फलंदाजीच्या व यष्टीरक्षणाच्या जोरावरती उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत इंद्रजीत गुंजवटे याने संघास तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळवून दिले होते तर जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये मुधोजी हायस्कूलचा संघ उपविजेता ठरला होता.त्यावेळी अंतिम सामन्यांमध्ये त्याने उत्कृष्ट यष्टीरक्षण करीत उत्कृष्ट फलंदाजी केली होती व एकाकी झुंज दिली होती . या कामगिरीच्या जोरावर त्याची विभागस्तरीय निवड चाचणीसाठी निवड झाली होती .
ही निवड जिल्हा क्रीडा परिषद, सांगली द्वारा विभागस्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेचे (14 वर्षे मुले) यांच्या आयोजनात करण्यात आलेले होते. या स्पर्धेच्या निवड चाचणी मध्ये एकूण 40 खेळाडूनीं सहभाग नोंदवला होता यामध्ये फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज , फलटणच्या इंद्रजीत गुंजवटे या खेळाडूने निवड चाचणीमध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्षण केल्याबद्दल त्याची यष्टीरक्षक फलंदाज म्हणून राज्यस्तरीय निवड चाचणीसाठी निवड झाली असून सदर निवड चाचणी रविवार दिनांक ०४ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी ०१:०० वा. शंकरराव मोहिते पाटील इंग्लीश मीडियम स्कुल व ज्यु कॉलेज शंकर नगर, अकलुज , ता माळशिरस, जि सोलापूर येथे होणार आहे .
इंद्रजीत गुंजवटे याला मुधोजी हायस्कूलचे क्रिकेट मार्गदर्शक प्रशिक्षक श्री अमोल नाळे व श्रीमंत रामराजे क्रिकेट ॲकॅडमी चे मिलिंद सहस्रबुद्धे व सोमनाथ चौधरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .
या निवडीबद्दल इंद्रजीत गुंजवटे यांचे व त्याला मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक प्रशिक्षक श्री अमोल नाळे यांचे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान विधानपरिषद आमदार मा.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर ,फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर , महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) सातारा जिल्हा अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर , क्रीडा समितीचे अध्यक्ष मा. श्री शिवाजीराव घोरपडे , सदस्य मा. श्री महादेवराव माने, प्रशासन अधिकारी श्री अरविंद निकम, प्रशालेचे प्राचार्य मा. श्री बाबासाहेब गंगावणे ,उपप्राचार्या सौ सुनिता माळवदे, ज्युनिअरचे उपप्राचार्य श्री ज्ञानदेव देशमूख , पर्यवेक्षक व्ही जी शिंदे, श्री नितीन जगताप ,पर्यवेक्षिका पाटील मॅडम , क्रीडा समितीचे सचिव सचिन धुमाळ व क्रीडा समितीचे सदस्य , शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी व इतर मान्यवरांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या