जी टी एन कंपनी मध्ये श्रीराम आनंद सोहळा संपन्न

जी टी एन कंपनी मध्ये श्रीराम पदयात्रा मध्ये सहभागी उद्धव मिश्रा व इतर

फलटण टुडे (बारामती दि .२३ ): –
 
बारामती एमआयडीसी येथील जी टी एन इंडस्ट्रीज कंपनी मध्ये श्रीराम जप व श्रीराम पूजा संपन्न करण्यात आली.

सोमवार २२ जानेवारी रोजी अयोध्येतील श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त  जीटीएन कंपनीमध्ये श्रीराम प्रतिमेचे पूजन व श्रीराम जपाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता या वेळी कंपनी परिसरात भव्य मिरवणूक  व गणेश मंदिरावर  विद्युत रोषणाई करून रांगोळी काढून, गुढी उभा करून, भगव्या पताका व झेंडे लावून ,पेढे लावून  आणि या सोहळ्याचे टीव्हीवर प्रक्षेपण सर्व कर्मचाऱ्यांना दाखवून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.

या प्रसंगी कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष उद्धव मिश्रा, महाप्रबंधक संतोष कणसे व ज्ञानदेव चामे, सी.बी कुलकर्णी ,कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी वल्लभ गावडे, पांडुरंग पवार व अधिकारी ,कर्मचारी उपस्तीत होते.

 

————–
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!