फलटण टुडे (फलटण दि २०) :-
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालयाची खो-खो खेळाडू कु.पूजा फडतरे हिची शिवाजी विद्यापीठ खो-खो संघामध्ये निवड झाली असून. दक्षिण पश्चिम विभागीय अंतर विद्यापीठ खो-खो स्पर्धा ह्या अवधेश प्रतापसिंग विद्यापीठ, मध्य प्रदेशातील रेवा या ठिकाणी संपन्न होणार आहेत.
या निवडी बद्दल कु . पुजा फडतरेचे व तीला मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक शिक्षक यांचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा विद्यमान विधान परिषद चे आमदार मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन तथा फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी तथा महाराष्ट्र खो- खो असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे चेअरमन श्री शिवाजीराव घोरपडे, प्रशासन अधिकारी श्री अरविंद निकम,मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एच.कदम , मुधोजी महाविद्यालयाचे क्रीडा मार्गदर्शक श्री स्वप्निल पाटील, श्री तायप्पा शेंडगे तसेच प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी आणि खो -खो चे आजी – माजी खेळाडू यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.