सखी सारथी सन्मान सोहळा संपन्न
सखी सारथी महिला ड्रायव्हिंग स्कूल्स ओनर असोसिएशनच्या अध्यक्षा शीतल कोठारी, आमदार उमाताई खापरे व सर्व पदाधिकारी व मान्यवर
फलटण टुडे (बारामती दि १९ ) :-
वाहन प्रशिक्षण क्षेत्रामध्ये नागरिकांना वाहन चालवणे शिकवणे व शासनाच्या नियमांचे पालन करा वाहतुकीमधील बदल लक्षात घ्या व व्यसन करू नका या बदल चालका मध्ये प्रबोधन करणे आदी माध्यमातून महिलांनी केलेल्या कामामुळे अपघाताचे प्रमाण कमी होणे साठी उत्तम कार्य होत आहे व शासनास महिला प्रशिक्षकांची मदत होत असल्याचे प्रतिपादन विधान परिषद च्या आमदार उमाताई खापरे यांनी प्रतिपादन केले.
सुरक्षितता सप्ताह निमित्त सखी सारथी महिला ड्रायव्हिंग स्कूल्स ओनर असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शुक्रवार दि.१९ जानेवरी रोजी सखी सारथी सन्मान सोहळा व वाहन प्रशिक्षण देणाऱ्या गुणवंत महिलांचा सत्कार सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी उमाताई खापरे उपस्तितांना मार्गदर्शन करत होत्या.
याप्रसंगी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मा. अधिकारी संजय ससाने , ऑस्ट्रेलिया येथील गुरु ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक मंदार ताम्हणकर मानसी ताम्हणकर,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुजित डोंगरचाळ, सुरेश आव्हाड,मा. नगरसेविका वैशाली खाडे, सखी सारथी महिला ड्रायव्हर्स ओनर्स असोसिएशनच्या राज्याच्या अध्यक्षा शितल कोठारी,व सुनिता चव्हाण ,महानंदा पन्हाळे, राजश्री पवार, नीता कुशारे, लता वाजपेयी, भारती पाटील, संपदा घाग, नोगीता बोरकर आणि ड्रायव्हिंग ट्रेनर व डिफेन्स प्रशिक्षक मुरली सुंद्राणी आदी मान्यवर उपस्तीत होते.
वाहन चालविताना प्रात्यक्षिक, निरीक्षण,महत्वाचे असून शालेय अभ्यासक्रमात वाहन प्रशिक्षण चालविणे समाविष्ट होणे गरजेचे असल्याचे मा. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाने यांनी सांगितले.
महिलां निर्व्यसनी असल्याने अपघात कमी होतात, तंत्रशुद्ध प्रशिक्षण महिला देतात,अनेकांना रोजगार मिळतो, महिलांच्या शिक्षणाचा फायदा मिळतो त्यामुळे शासनाने महिलांना खास बाब म्हणून वाहन प्रशिक्षण साठी सहकार्य करावे अशी मागणी सखी सारथी महिला ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्षा शीतल कोठारी यांनी सांगितले
या वेळी कल्याण येथील सौ. माधुरी अनंत कदम यांना सखी सारथी पुरस्कार २०२४ देऊन सन्मानित करण्यात आले व राज्यातील वाहन प्रशिक्षण क्षेत्रातील गुणवंत महिलांना सन्मानित करण्यात आले.
ऑस्ट्रेलिया सिडनी येथे गुरु ड्रायव्हिंग स्कूल चालवणारे मंदार ताम्हणकर सौ मानसि ताम्हणकर यांनी आपले अनुभव कथन केले.