फलटण टुडे (बारामती दि १९): –
सावळ येथील ज्ञानसागर गुरुकुलमध्ये मुलींना वाढत्या वयानुसार शरीरामध्ये होणारे बदल, वाढत्या वयातील समस्या, पालकांचे अज्ञान, मुलींना समाजाकडून मिळणारा दुय्यम दर्जा या सर्व गोष्टींचे गांभीर्य लक्षात घेऊन विद्यालयात इयत्ता ५ वी ते इयत्ता १० वी पर्यंतच्या मुलींचे समुपदेशन व कायद्याचे मार्गदर्शन विषयी ऍड सुप्रिया बर्गे यांनी मार्गदर्शन केले.
या वेळी संस्थेचे अध्यक्ष सागर आटोळे, सचिव मानसिंग आटोळे, उपाध्यक्षा रेश्मा गावडे, विश्वस्त पल्लवी सांगळे,दिपक सांगळे, दीपक बिबे, सीईओ संपत जायपत्रे, विभाग प्रमुख गोरख वनवे,मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे, सुधीर सोनवणे , निलिमा देवकाते, राधा नाळे, निलम जगताप, रिनाज शेख उपस्थित होते
वाढत्या वयानुसार होणारे बदल, शारीरिक समस्या, मानसिक समस्या आणि त्यांच्या जडणघडणीत पालकांचा सहभाग , शाळेचा सहभाग या सर्व बाबींमध्ये प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडली पाहिजे.
मोबाईल चा कामापूरता विद्यार्थी जीवनात योग्य आणि सकारात्मक उपयोग करावा ,विद्यार्थिनींना शिक्षणाबरोबर व्यवसाय मार्गदर्शन, विविध क्षेत्रातील नोकरीतील संधी, त्या मिळविण्यासाठी कोणती तयारी करावी तसेच प्रत्येक क्षेत्रातील नोकरी मिळविण्यासाठी सकारत्मक रहा,
मुलींनी समाजात वावरत असताना सामाजिक भान जपले पाहिजे, शिक्षण घेताना नौकरी ,व्यवसाय करताना कायद्याचे ज्ञान आवश्यक असल्याचे ऍड सुप्रिया बर्गे यांनी सांगितले.