फलटण टुडे (बारामती ) :-
श्री शिव विद्या प्रसारक संस्थेचे बाल विकास मंदिर ,कारभारी स्मृती चषक तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा २०२४ मध्ये विद्या प्रतिष्ठान विनोदकुमार गुजर बाल विकास मंदिर ची इयत्ता ४ थी विद्यार्थ्यांनी कु. काव्या सुधीर खोत हिने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
माझा आवडता संत ‘ज्ञानेश्वर माऊली’ या विषयावर तिने वक्तृत्व कला सादर केली. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर,मा.नगराध्यक्षा सदाशिव सातव,ऍड विजय बर्गे,मुख्यध्यापिका उज्जवला जाधव आदी मान्यवर उपस्तीत होते. विद्या प्रतिष्ठान चे मुख्यध्यापक आशिष घोष, शिक्षिका वैशाली सोनटक्के, किशोरी खोत यांनी कु. काव्या हिस मार्गदर्शन केले