फलटण टुडे वृतसेवा (म्हसवड ):-
म्हसवड ता. माण येथे श्री शंभू महादेव मित्र मंडळ व क्रांती ग्रुप आयोजित भव्य नाईट क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन दिमाखदार पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे राज्य संघटक सचिव ॲड. राजू भोसले यांच्या हस्ते सामन्याचे टॉस करुन करण्यात आले.
याप्रसंगी ॲड. राजू भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सचिन माने, सामाजिक कार्यकर्ते अशोक काळे , प्रा. राजेंद्र माने सर, लेबर कॉन्ट्रॅक्टर विजय माने यांच्या हस्ते बॅट ,बॉल , स्टंप व मैदानाचे पूजन करण्यात आले.
यावेळी संकेत माने , शुभम नाईक , हर्षद काळे , रणजीत सरक , गणेश माने , सुनील माने , अजय माने , नितीन वाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटन प्रसंगी ॲड. राजू भोसले म्हणाले , धावपळीच्या जीवनात खेळाची भावना रुजली जावी व क्रिकेट शौकिनांच्या क्रीडा कौशल्याचा विकास व्हावा या उद्देशाने या स्पर्धा भरवल्या असून तरुणांनी खेळाच्या माध्यमातून शारीरिक व बौद्धिक विकास करावा. असे तरुणांना आवाहन करून ॲड. राजू भोसले यांनी संयोजकांचे स्पर्धा आयोजित करुन युवकांना खेळाची संधी दिल्या बाबत विशेष कौतुक केले.
याप्रसंगी युवा नेते सचिन माने यांनी क्रांती ग्रुप म्हसवड , युवा नेते अभयदादा जगताप, श्रीमंत तेजसिंह राजेमाने , डॉ. विकास जगताप , महादेव जगताप यांनी स्पर्धेसाठी बक्षीसे देवून व इतर विशेष सहकार्य केले असल्याचे सांगितले व तरुणांनी सिद्धनाथ हायस्कूल शेजारी सनगर गल्ली जवळील मैदानात होणाऱ्या क्रिकेट सामन्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत युवा नेते सचिन माने व राजेंद्र माने सर यांनी केले. आभार सामाजिक कार्यकर्ते अशोक काळे यांनी मानले व सूत्रसंचालन नितीन वाडेकर यांनी केले. यावेळी संकेत माने , शुभम नाईक , हर्षद काळे , रणजीत सरक , गणेश माने , सुमित माने , अजय माने , विजय माने या प्रमुख मान्यवरांसहित प्रतिष्ठित मंडळी , अनेक युवक प्रतिनिधी व बहुसंख्य खेळाडू उपस्थित होते.