फलटण टुडे वृत्तसेवा ( सुरेंद्र फाळके ) :-छत्तीसगड मधील रायपूर येथे होणाऱ्या१९ वर्षाखालील मुले व मुली यांच्याराष्ट्रीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेसाठी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मालोजीराजे शेती विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक श्री. उत्तम घोरपडे यांची महाराष्ट्र राज्य शालेय क्रीडा विभागामार्फत, राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेसाठी राष्ट्रीय प्रशिक्षक (नॅशनल कोच) म्हणून निवड झाली असून. सदर स्पर्धा १८ ते २२ जानेवारी २०२४ रोजी रायपूर येथे होणार आहेत.
उत्तम घोरपडे यांच्या निवडीबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर , फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे चेअरमन मा. श्री शिवाजीराव घोरपडे , सदस्य महादेवराव माने , प्रशासन अधिकारी श्री अरविंद निकम, मालोजीराजे शेती विद्यालयाचे प्राचार्य श्री ज्ञानदेव कोळेकर , उपप्राचार्य श्री. बाळकृष्ण काळे व सर्व क्रीडा समितीचे सचिव सचिन धुमाळ , तायप्पा शेंडगे , अमोल नाळे , सुरेंद्र फाळके , मनोज कदम , स्पप्नील पाटील, सुरज ढेंबरे अमित काळे व सर्व शिक्षक वृंद व क्रीडाप्रेमी यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.