फलटण टुडे (बारामती ): –
बारामती एमआयडीसी येथील उद्योजकाची असलेली संघटना बिडा ( BIDA – Baramati Industrial Development Association ) २०२४ दिनदर्शिका चा प्रकाशन सोहळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या प्रसंगी बिडा चे अध्यक्ष धनंजय जामदार, सचिव अनंत अवचट, खजिनदार अंबिरशाह शेख वकिल, संचालक महादेव गायकवाड, संभाजी माने, चंद्रकांत नलवडे, विष्णू दाभाडे, हरीश खाडे, सूर्यकांत रेड्डी, राजन नायर उद्योजक महादेव शिंदे, नितीन जामदार, पंडित रणदिवे या प्रसंगी उपस्थित होते.
बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशन
लवकरच बारामती एमआयडीसी मध्ये भव्य औद्योगिक प्रदर्शन आयोजित करणार असून राज्य शासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही अजित पवार यांनी यावेळी दिली.