राज्य परिवहन (एस,टी.)महामंडळ प्रतीवर्षी जानेवारी महिन्यात सुरक्षितता अभियान राबवत असते.
रा.प.फलटण आगारात आगार व्यवस्थापक रोहित नाईक याचे हस्ते अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी स्थानक प्रमुख राहुल वाघमोडे,वाहतुक निरीक्षक सुहास कोरडे,सहाय्यक वाहतुक निरीक्षक धिरज अहिवळे तसेच बहुसंख्य चालक-वाहक व कार्यशाळा कर्मचारी ऊपस्थित होते. दि.११ जानेवारी ते २५ जानेवारी अखेर अभियान चालणार आहे.
यावेळी आगार व्यवस्थापक रोहित नाईक यांनी सर्व चालकांनी दक्षतेने व काळजी पुर्वक वाहन चालवुन प्रवाशांना अपघात विरहित सेवा द्यावी असे आवाहन केले व सुरक्षित प्रवास हे एस.टी.महामंडळाचे ब्रीद सार्थ करावे असे प्रतीपादन केले.सर्वाना सुरक्षितता अभियानाचे बिल्ले वाटप करण्यात आले.