ऊत्तम आरोग्य हिच संपत्ती-डाँ.जे.टी.पोळ

फलटण टुडे वृत्तसेवा :- 

आपले ऊत्तम आरोग्य हिच आपली खरी संपत्ती आहे,सर्वानी आपल्या आरोग्या कडे वेळो वेळी लक्ष दिले पाहीजे, तंबाखु तसेच ईतर व्यसनाच्या आहारी न जाता आपण आरोग्य संभाळले पाहीजे असे प्रतिपादन प्रसिध्द हदय रोग तज्ञ डाँ.जे.टी.पोळ यांनी केले.
     
निकोप हाॅस्पीटल व फलटण एस.टी. आगाराच्या संयुक्त विद्यमाने फलटण आगारातील कर्मचारी व प्रवाशी यांचे करिता आयोजीत करण्यात आलेल्या मोफत सर्व रोग निदान व मोफत औषधोपचार शिबीरात ते बोलत होते. यावेळी आगार व्यवस्थापक रोहित नाईक,स्थानक प्रमुख राहुल वाघमोडे,वाहतुक निरीक्षक सुहास कोरडे,सहाय्यक वाहतुक निरीक्षक सुखदेव अहिवळे ,डाँ.राजश्री मेथा ऊपस्थीत होते.

     
या शिबिरात रक्तदाब,शुगर व ईतर आजारा बद्दल तपासणी करुन आवश्यक औषधे मोफत देण्यात आली.डाँ.राजश्री मेथा,देवकाते ,रणपिसे यांनी रुग्ण तपासणी केली.

      यावेळी बहुसंख्य एस.टी.कर्मचारी व प्रवाशी बंधु तसेच स्थानकावरील फेरीवाले यांनी शिबिराचा लाभ घेऊन धन्यवाद दिले. सुरुवातीला डाँ.जे.टी.पोळ,डाँ.मेथा व सहकारी याचां एस.टी,प्रशासना तर्फे सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सुञ संचालन व प्रास्ताविक श्रीपाल जैन यांनी केले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!