अल्टीमेट खो-खो सीझन २ च्या अंतिम फेरीत मुंबईकर व कोल्हापूरकर कर्णधारांचा लागणार कस

  

फलटण टुडे (भुवनेश्वर, १२ जाने. ): –
 अल्टीमेट खो-खोच्या सीझन २ मध्ये शनीवारी पहिला तृतीय क्रमांकाचा सामना ओडिशाf जगरनॉट्स व तेलगु योध्दास यांच्यात होणार असून गेल्या वेळी अंतिम फेरीत लढलेले दोन्ही संघ या वेळी तिसऱ्या क्रमांकासाठी लढणार आहेत. प्रथमच अंतिम फेरीत पोहचलेल्या गुजरात जायंट्स व चेन्नई क्विक गन्स यांच्यात अंतिम महामुकाबाला होणार आहे.   

अक्षय भांगरे : महाराष्ट्राची राजधानीतील व मुंबईकर असलेल्या गुजरात जायंट्सच्या संघाचा कर्णधार अक्षय भांगरेचा उद्या अंतिम फेरीत कस लागेल तो चेन्नई क्विन गन्स संघासमोर. उपांत्य फेरीत ओडिशा जगरनॉट्स विरुध्द खेळताना स्थानिक प्रेक्षकांसमोर खेळायचे होते त्यामुळे जेंव्हा जेंव्हा ओडिशा-ओडिशा असा आवाज येईल त्यावेळी तो गुजरात-गुजरात असाच ऐकायचं हेच धोरण ठेवल्यामुळे आमचा विजय सोपा झाला असे त्याने उपांत्य फेरीतील विजयानंतर सांगितले. अल्टीमेट खो-खोच्या सीझन १ व सीझन २ च्या आयोजनाबद्दल विचारले असता गेल्या वेळेपेक्षा या वेळी जबरदस्त आयोजन असल्याचे सांगितले. उद्या आमच्या समोर कोणताही संघ आला तरी आम्ही पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरू असे अक्षयने सांगितले. दोन्ही संघातले खेळाडू तुल्यबळ असून रामजी कश्यप विरुध्द विशेष रणनीती करणार असल्याचे त्याने स्पष्ट केले. 

अमित पाटील : तांबडा पांढरा रश्यासाठी प्रसिध्द असलेल्या व कोल्हापूरकर असलेला चेन्नई क्विक गन्सचा कर्णधार अमित पाटील उद्याच्या अंतिम फेरीत निकराची लढत देणार असल्याची ग्वाही त्यने दिली. खरतर उपांत्य फेरी व अंतिम फेरी हे आमचे ध्येय होते असे त्याने सांगितले. त्यापैकी उपांत्य फेरीचा अडथळा दूर झाला असून अंतिम फेरीनंतर अल्टीमेट खो-खोच्या सीझन २ चा चषक उंचावण्याचे स्वप्न आमच्या संघाने ठरवलायचे त्याने सांगितले. उपांत्य फेरीत रामजी कश्यप पहिल्या डावात थोडा कमी पडला असला तरी त्याने दुसऱ्या डावात ती कसर भरून काढल्याने आमचा विजय सोपा झाला असेही तो म्हणाला. आमच्या संघातील सर्व खेळाडूंमधील समन्वय चांगला असल्याने प्रतीस्पर्धी संघातील खेळाडूंमध्ये धडकी भरवणारी खेळी आमचे खेळाडू करतील व विजयी चषकावर नाव कोरतील असेही तो म्हणाला.  

संजीव शर्मा : गुजरात जायंट्सचे प्रमुख प्रशिक्षक असलेले संजीव शर्मा यांनी गुजरात जायंट्स अंतिम फेरीत पोहोचल्याने आनंद झाला असल्याचे सांगितले. समोर कोणताही संघ आला तरी त्यासाठी आम्ही तयार असल्याचे त्यांनी सांगीतले. आम्ही आमच्य खेळाडूंची तयारी अशी केली आहे कि पर्तीस्पर्धी कोणीही असो आम्ही जिंकण्याच्या उद्देशानेच खेळणार आहोत. त्यांचे सहायक प्रशिक्षक मयुरेश पालांडे यांनी उद्याच्या अंतिम फेरीबद्दल बोलताना आमचा प्रत्येक खेळाडू बारकाईने सराव करत असल्याचे सांगितले व समोरच्या खेळाडूचा सुध्दा अभ्यास करून आम्ही प्रत्येकाठी वेगवेगळी रणनीती आखली असून आम्ही विजयी चषक उंचावण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!