फलटण टुडे (फलटण दि.13):-
शिरवळ येथील विश्वासराव नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये झालेल्या शिवाजी विद्यापीठ अंतरविभागीय महिला जुदो स्पर्धेमध्ये मुधोजी महाविद्यालय, फलटणच्या कु.ऋतुजा किशोर ( गुड्डू ) पवार हिने53 किलो वजनी गटात कास्यपदकासह तृतीय क्रमांक संपादन केला.
या यशाबद्दल कु. ऋतुजा किशोर पवार हिचे व तीला मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक यांचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,संस्थेचे प्रशासन अधिकारी श्री अरविंद निकम, मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एच. कदम सर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.