माणवासीय रहिवाशी प्रतिष्ठानचा दुसरा वर्धापनदिन उत्साहात
देवकर कुटूंबियांना माणवासीय भूषण पुरस्कार देताना आमदार जयकुमार गोरे व प्रभाकर देशमुख, प्रा उमेश पांढरे व इतर
फलटण टुडे (बारामती ): –
माण तालुक्याचा सर्वांगीण विकास होत असताना दुष्काळी भाग हा शिक्का लवकर पुसणार आहे व बारामती कर नागरिक सुद्धा नोकरी,व्यवसाय,उद्योग निमित्ताने माण मध्ये येतील स्थायिक होतील व बारामती रहिवासी संघ स्थापन करतील तेव्हा खरा माण तालुक्याचा विकास झाला असे समजू असे प्रतिपादन माण तालुक्याचे आमदार जयकुमार गोरे यांनी केले.
बारामती येथील माणवासीय रहिवाशी प्रतिष्ठानचा वर्धापनदिन निमित्त बारामती तालुक्यात माण तालुक्यातील स्थाईक झालेले कुटुंबिय यांचा स्नेह मेळावा व माणवासीय भूषण पुरस्कार सोहळा प्रसंगी
आमदार जयकुमार गोरे बोलत होते या वेळी त्यांनी माण तालुक्यातील विविध क्षेत्रातील विकासाचा आढावा घेतला व दुष्काळी परिस्थिती बदलून मान तालुका बागायती भाग होईल व औद्योगिक करण होणार असल्याचे सांगितले.
या प्रसंगी बारामती औद्योगिक वसाहत चे अध्यक्ष रणजित पवार,माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, प्रशांत सातव,अजित पवार, शशिकांत नाना देशमुख,शामराव राऊत,काशिनाथ जळक,शंकर कचरे, रामचंद्र भोसले,अशोक देवकर,बापूराव खाडे, अंकुशराव कदम, भाऊसो गायकवाड, मानवासीय रहिवासी संघाचे अध्यक्ष उमेश पांढरे,पिंटू खाडे, आप्पासो भांडवले,मनोज देवकर,सागर खाडे, पांडुरंग अवघडे,शिवाजी बोराटे,सयाजी जगदाळे,धनाजी जगदाळे,तात्यासाहेब खाडे,अमोल कदम, दिग्विजय गायकवाड, दुर्योधन पारसे, राहुल भोसले,लालासो माने, हनुमंत खाडे,गिरीष सूर्यवंशी, आदी मान्यवर उपस्तीत होते.
यावेळी देवकर कुटुंबियांना
माणवासीय भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर राष्ट्रीय अंधबुद्धिबळपटू संस्कृती मोरे आणि अभिराज खाडे,अदिती चव्हाण, या गुणवंत विद्यार्थ्यांना आणि माऊलीअमृततुल्य गुळाचा चहा खाडे परिवार, डॉ.राजाराम ढोक, रमेश कुलकर्णी , देवेंद्र खाडे,तात्यासाहेब खाडे,आबासो जगदाळे, सुभेदार जगदाळे, गणेश पवार आदींना त्यांच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यबदल गौरवनियात आले
माणवासीय भूषण पुरस्काराच्या मानपत्राचे वाचन प्रा.कल्पना बापू खाडे यांनी केले. प्रास्ताविक प्रा. उमेश खाडे यांनी केले तर सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले. माण तालुक्यातील गजीनृत्या ने उपस्तितांचे मनोरंजन केले व संस्कृतीची ओळख करून दिली.