अमरहिंद मंडळ आयोजित आंतरशालेय कबड्डी स्पर्धा मुलांमध्ये साने गुरुजी हायस्कूल तर मुलींमध्ये एसआयईएस हायस्कूल विजयी

     

समर्थ कासुर्डे व तनुश्री शिंदे स्पर्धेत सर्वोत्कृष्ट
मुंबई, ७ जाने. (क्री. प्र.), दादर येथील अमर हिंद मंडळ, अमर वाडी, गोखले रोड येथे आंतरशालेय कबड्डी स्पर्धा अमरहिंद मंडळाने आयोजित केली होती. श्रीमती वर्षा भोसले वेस्टर्न रेल्वे सहाय्यक प्रशिक्षक यांच्या हस्ते कबड्डी स्पर्धेचे उदघाटन पार पाडले. तर बक्षीस समारंभ वेस्टर्न रेल्वे प्रशिक्षक धर्मवीर चिल्लर यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी मंडळाचे कार्योपाध्यक्ष विजय राणे, सदस्य रमेश नाटेकर, साईनाथ काळसेकर, दीपक साडविलकर प्रमुख कार्यवाह रवींद्र ढवळे, खजिनदार प्रफुल पाटील, संयुक्त कार्यवाह जतीन टाकळे सदस्य अमित किंभहूने, राजेंद्र कर्णिक, निलेश सावंत, रोहन चव्हाण, इतर पदाधिकारी व कबड्डी प्रेमी उपस्थित होते.  
या स्पर्धेत कबड्डीचे एकूण २६ शाळांचे संघ सहभागी झाले होते. मुलांच्या अंतिम सामन्यात कबड्डी मध्ये दादरच्या साने गुरुजी विद्यालयाने (इंग्रजी माध्यम) माटुंग्याच्या गौरीदत्त मित्तल विद्यालयाचा ४६-१५ (मध्यंतर ३७-११) असा धुव्वा उडवत ३१ गुणांनी विजय मिळवत अमरहिंद चषकावर नाव कोरल. या सामन्यात साने गुरुजी हायस्कूलच्या चढाईत समर्थ कासुर्डेने तर पकड करताना विघ्नेश परबने जोरदार कामगिरी केली व त्याच्याच जोरावर दादरच्या साने गुरुजी विद्यालयाने विजेतेपदावर नाव कोरले. तर माटुंग्याच्या गौरीदत्त मित्तलच्या चढाईत सुंदरम गुप्ता तर पकड करताना रणवीर सिंगने केलेली कामगिरी अखेर कमीच पडली.
मुलींचा अंतिम सामना अतिशय चुरशीचा झाला. या सामन्यात माटुंग्याच्या एसआयईएस विद्यालयाने विक्रोळीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयावर ४४-४३ (मध्यंतर २५-१९) असा एक गुणाने अतिशय चुरशीच्या सामन्यात विजय मिळवला. या सामन्यात एसआयईएस विद्यालयाच्या तनुश्री शिंदेने कमालीच्या चढाया करत तर आर्या देवकरने उत्कृष्ट पक्कड करत संघाला विजय मिळवून दिला तर पराभूत डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाच्या दृष्टी कुंभारने चढाईत संघाला बाज्बूत स्थिती मिळवून दिली तर स्वरा पवारने चांगल्या पक्कड करत कडवी लढत दिली पण शेवटी एसआयईएस विद्यालयाने निसटता विजय मिळवत अमरहिंद चषकावर नाव कोरल.   
               
उपांत्य फेरीत मुलांमध्ये साने गुरुजी विद्यालयाने सोशल सर्व्हिस हयास्कुल्चा ६५-३१ असा व गौरीदत्त मित्तल विद्यालयाने आंध्र एज्युकेशन सोसायटीचा ६५-६० असा पराभव केला. तर मुलींच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात एसआयईएस विद्यालयाने शारदाश्रम विद्यामंदिरचा ७०-१७ असा धुव्वा उडवला तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाने आंध्र एज्युकेशन सोसायटीचा ३८-१२ असा दणदणीत पराभव केला.     
या स्पर्धेत पुढील खेळाडू सर्वोत्कृष्ट ठरले 
उत्कृष्ट चढाई – सुंदरम गुप्ता (गौरीदत्त मित्तल), स्वरा पवार (डॉ. बाबासाहेब आंबेडकर) 
उत्कृष्ट पकड – तन्मय टिकेकर (साने गुरुजी ), आर्या देवकर (एसआयईएस) 
सर्वोत्कृष्ट खेळाडू – समर्थ कासुर्डे (साने गुरुजी ), तनुश्री शिंदे (एसआयईएस)
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!