फलटण टुडे : –
विजयपूरा (पूर्वीचे बिजापूर), कर्नाटक येथे ९ ते १२ जानेवारी दरम्यान होत असलेल्या २८व्या राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याच्या सायकलिंग संघाचे नेतृत्व पुरुष गटात पुण्याचा चिन्मय केवलरमाणी आणि महिला गटात अहमदनगरची प्रणिता सोमण करणार आहे.
बारामती येथे झालेल्या ४थ्या महाराष्ट्र राज्य रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा आणि पहिल्या निवडचाचणी स्पर्धेमधील कामगिरीवरुन राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ निवडण्यात आला. सायकलिंग फेडरेषन ऑफ इंडीयाचे उपाध्यक्ष आणि कॅमचे संघटन सचिव प्रताप जाधव यांच्या अध्यक्षतेखालील कॅम चे सचिव प्रा. संजय साठे, महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट क्रीडा प्रशिक्षक पुरस्कार सन्मानीत राष्ट्रीय पदक विजेती दिपाली पाटील व मिलींद झोडगे आणि शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन्मानीत उत्तम नाळे यांच्या निवड समितीने हा संघ निवडला.
महाराष्ट्रचा संघ पुढील प्रमाणे –
युथ बॉईज (१२ ते १४ वर्षे वयोगट) – वेदांत पानसरे (मुंबई शहर), श्रीनिवास जाधव, आशिष पवार (दोघे पुणे क्रीडा प्रबोधिनी), हूजेफा मुल्ला (कोल्हापूर) युथ गर्ल्स (१२ ते १४ वर्षे वयोगट) – मानसी महाजन (पुणे), प्राजक्ता सूर्यवंशी (सांगली), निकिता शिंदे (पुणे क्रीडा प्रबोधिनी), शिवाली प्रमोद जाधव (बुलढाणा), सब ज्युनियर बॉईज (१५ आणि १६ वर्षे वयोगट) – सिद्धेश घोरपडे (पुणे क्रीडा प्रबोधिनी), आर्यन मळगे (कोल्हापुर), हरीश डोंबाळे, ओंकार गांधले (दोघे पुणे क्रीडा प्रबोधिनी) सब जूनियर गर्ल्स (१५ आणि १६ वर्षे वयोगट) – जुई नारकर (मुंबई शहर), श्रावणी परीट (पिंपरी चिंचवड), श्रावणी घोडेस्वार (कोल्हापूर), आसावरी राजमाने (पुणे क्रीडा प्रबोधिनी), जूनियर बॉईज (१७ आणि १८ वर्षे वयोगट) – वीरेंद्रसिंह पाटील (पुणे क्रीडा प्रबोधिनी), विपलव मालपटे (पुणे), अश्विन मर्ढेकर (सातारा), सोएब मुलांनी, निहाल नदाफ (दोघे सांगली), जूनियर गर्ल्स (१७ आणि १८ वर्षे वयोगट) – अपूर्वा गोरे (अहमदनगर), मनाली रत्नोजी (पुणे), स्नेहल माळी (नवी मुंबई), सृष्टी कुंभोजे (कोल्हापूर), सुजाता वाघेरे (नाशिक), इलाईट मेन्स (१९ वर्षावरील) – चिन्मय केवलरमानी (कर्णधार, पुणे), सूर्या थातू (पिंपरी चिंचवड), सुदर्शन देवर्डेकर, सिद्धेश पाटील (दोघे कोल्हापूर), यश थोरात (ठाणे), करण सोनी (नवी मुंबई), वुमेन इलाईट (१९ वर्षावरील) – प्रणिता सोमन (कर्णधार, अहमदनगर), ऋतिका गायकवाड (नाशिक), रणजीत घोरपडे (कोल्हापूर), योगेश्वरी कदम (सांगली), राधिका दराडे (बारामती) मेन अंडर २३ (१९ ते वर्षे वयोगट) – प्रणव कांबळे, हनुमान चोपडे (दोघे पुणे), मुस्तफा पत्रावाला (ठाणे), तेजस धांडे (नागपूर).