फलटण टुडे वृत्तसेवा दि ५ : –
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय फलटण येथील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी यांनी आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या ११३ व्या जयंती निमित्त फलटण येथे रॅली चे आयोजन केले होते. रॅलीची सुरूवात महात्मा फुले चौक येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. या नंतर फलटण शहरातील सर्व महामानवाच्या स्मारकांना पुष्पहार अर्पण करून रॅलीची सांगता करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा डॉ नरेंद्र नार्वे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्रृष्टी शिरसाट या विद्यार्थ्यिनीने “मी सावित्री बोलतीये” हा एकपात्री प्रयोग सादर केला तसेच शरण्या गायकवाड, तेजस्विनी पखाले, शिवांजली कदम या विद्यार्थ्यांनीनी मनोगते व्यक्त केली.
तत्पूर्वी महाविद्यालयात महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व नंतर रॅली संपूर्ण फलटण शहरातुन सर्वच महामानवांच्या स्मारकांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या उपक्रमाच्या समन्वयक, सिव्हिल इंजिनिअरिंग विभागप्रमुख प्रा. सौ. धनश्री भोईटे यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार समाजात रुजावेत, स्त्रियांना समान हक्क,अधिकार व संधी मिळावी या उद्देशाने हा उपक्रम राबविला गेल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा डॉ नरेंद्र नार्वे यांनी सांगितले.
या रॅली वेळी फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी उपस्थित राहुन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.