फलटण टुरे वृत्तसेवा बारामती: –
रुई येथील रहिवासी व पुणे जिल्हा राष्ट्रवादी सरचिटणीस प्रा अजिनाथ चौधर यांना बारामती नगरपरिषदेच्या १५९ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘स्वछता दूत’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष जवाहार शहा -वाघोलीकर ,भारती मुथा, पोर्णिमा तावरे ,संध्या बोबडे, माजी उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव पांडुरंग आटोळे, विजय खरात बारामती नगर परिषदेचे मुख्य अधिकारी महेश रोकडे यांच्या हस्ते सदर पुरस्कार देण्यात आला.या प्रसंगी माजी नगरसेवक व विविध मान्यवर उपस्तीत होते.
रुई परिसरात नगरपरिषद च्या विविध स्वछता अभियान मध्ये प्रमुख सहभाग व परिसर स्वच्छ, सुंदर,हरित रहावा म्हणून स्वतः विविध उपक्रम राबविले आहेत त्यांच्या कार्याची दखल घेऊन नगरपरिषद ने त्यांना स्वछता दूत म्हणून पुरस्काराने गौरविले आहे.
हा पुरस्कार रुई मधील सर्व नागरिकांना समर्पित करत असल्याचे प्रा अजिनाथ चौधर यांनी सांगितले.
——————