फलटण टुडे वृत्तसेवा दि ४:-
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या
श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिरचे वार्षिक पारितोषिक वितरण व वार्षिक स्नेहसंमेलन समारंभ शनिवार, दि. ०६ जानेवारी २०२४ रोजी सायं. ५.०० वाजता. मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज प्रांगण येथे संपन्न होत आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची उपस्थिती असून या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन पोलिस निरीक्षक, फलटण शहर पोलिस स्टेशन मा. श्री. सुनिल सिताराम शेळके व अधिव्याख्याते, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, फलटण मा. डॉ. सतिश बबनराव फरांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा विविध गुणदर्शन कार्यक्रम व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होणार आहे.
वरील कार्यक्रमास शोभा वाढवण्यास पालक व श्रोते वर्गांनी उपस्थित राहावे असे प्रतिपादन श्रीमंत निर्मलादेवी विद्यामंदिर , फलटणच्या मुख्याध्यापिका सौ वैशाली हिंदुराव जाधव यांनी केली आहे