फलटण टुडे वृत्तसेवा दि. ४ : –
मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर येथे बुधवार दिनांक ३ जानेवारी २०२४ रोजी प्रथम शिक्षिका व प्रथम मुख्याध्यापिका म्हणून ज्यांनी स्त्री शिक्षणाच्या उद्धारासाठी हाल अपेस्ट सहन करून स्त्री कल्याणाचे महान कार्य केले अशा अक्षर ज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रशालेमध्ये न भूतो न भविष्यती असा बालगोपाळांचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम “आकाशी उंच भरारी ” घेणाऱ्या गरुडाप्रमाणे संपन्न झाला.
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मा.सौ. शबनम मुजावर व इतर मान्यवर
यावेळी शिक्षण विभाग सातारच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मा.सौ. शबनम मुजावर यांच्या प्रमुख उपस्थितीत वार्षिक स्नेहसंमेलनाचा भव्य दिव्य असा कार्यक्रम पार पडला
यावेळी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते त्यांच्या शुभहस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन त्यांच्या पाठीवरती शाब्बासकीची थाप देण्यात आली .
यावेळी बोलताना मा . श्रीमंत संजीवराजे म्हणाले की विद्यार्थ्यांना वार्षिक स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देणारा असा हा हवा हवासा वाटणारा कार्यक्रम आहे .या संस्थेला खूप जुनी अशी परंपरा आहेया विद्यालयात अनेक शिक्षण घेलेले विद्यार्थी घेडले आहेत त्यामुळे मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा लवकरच आपण आयोजित करणार आहोत असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले
तसेच या कार्यक्रमास लाभलेल्या अध्यक्षा मा.सौ. वसुंधरा नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेचे मा.मुख्याध्यापक श्री.रुपेश शिंदे यांनी घेतलेल्या कष्टाचे चीज झाले व असा न भूतो न भविष्यती कार्यक्रम आकारास आला व नेत्रदीप असा संपन्न झाला .विद्यार्थ्यांनी कलाकार म्हणून आलेल्या उत्साहाचे उधाण त्यांच्या नृत्यअविष्कारातून प्रदर्शित केले तर पालकांनी व इतर श्रोत्यांनी दिलेला प्रतिसाद हा पाहण्याजोगा होता.
या वार्षिक स्नेहसंमेलनास फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक मा. श्री किशोरसिंह नाईक निंबाळकर , फलटण एज्युकेशन सोसायटीचे नियमक मंडळाचे सर्व सदस्य, मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर शाळा समितीचे सर्व सदस्य,शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य शिक्षक व पालक संघाचे सर्व सदस्य ,अंतर्गत तक्रार निवारण समितीचे सर्व सदस्य तसेच फलटण एज्युकेशन सोसायटीच्या इतर प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक व सर्व बालक मंदिरच्या चे सर्व मुख्याध्यापक ,मुख्याध्यापिका या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम अतिशय योग्य मार्गदर्शन व सुसूत्रतेमुळे उत्कृष्ट अशा नियोजनात पार पडला त्यास प्रशालेते सर्व पालक , विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.