मुधोजी हायस्कूल येथे सन २०२३ / २४ वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
स्नेहसंमेलनात अध्यक्षीय भाषण करताना श्रीमंत संजीवराजे व इतर मान्यवर
फलटण टुडे. (वृत्तसेवा, फलटण ):-
फलटण येथील मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. यामध्ये लोकनृत्य, ‘महाराष्ट्राची संस्कृती’ , ‘छत्रपती शिवाजी महाराज ‘ यांचे स्फुर्ती गीत , देशाची एकात्मता व सर्वधर्म समभाव या विषयावरील कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आले . या स्नेहसंमेलना ची सुरुवात श्रीमंत मुधोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून , गणेश वंदनाने झाली
मुधोजी हायस्कूल या विद्यालयास १५० वर्षाची परंपरा असून येथे मध्यंतरीच्या काळामध्ये जेंव्हा जुनी ११वी मॅट्रिक परीक्षा होती त्या काळामध्ये काही कारणास्तव वार्षिक स्नेहसंमेलनाची ही परंपरा खंडीत झाली होती . ती परंपरा सन २०२३ / २४ या वार्षापासून पुन्हा सुरू झाली. त्याबद्दल प्राचार्य बाबासाहेब गंगवणे व त्यांचे सर्व सहकारी यांची मी विशेष अभिनंदन करतो व आभार मानतो. कारण स्नेहसंमेलना च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो विद्यार्थ्यांसाठी स्नेहसंमेलन एक हक्काचे व्यासपीठ असते त्यामुळे स्नेहसंमेलन होणे गरजेचे आहे ते तुम्ही उपलब्ध करुन दिले आहे .
या शाळेला जुनी परंपरा असल्यामुळे या शाळेत शिकलेले अनेक विद्यार्थी आज उच्च पदावरती काम करीत आहेत . तसेच कला , क्रीडा , संस्कृतीक , सामाजिक , राजकीय अशा विविध क्षेत्रातही अनेक विद्यार्थ्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे . तसेच क्रीडा क्षेत्रात वाव मिळावा यासाठी येथील सर्व शिक्षक वर्ग सहकार्य करत आहेत. यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रातही आपला ठसा उमटवलेला आहे .
तसेच प्रशालेने आपला शैक्षणिक स्तर नेहमीच उच्च दर्जाचा राखला आहे. त्यामुळे संस्थेने परिसरातील नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे . आज संस्थेचा नावलौकिक फलटण तालुक्यात पसरलेला आहे असे मनोगत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.
मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य श्री बाबासाहेब गंगवणे यांनी शाळेची प्रगती तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळविलेले विशेष प्राविण्य याची माहिती यावेळी आपल्या प्रास्ताविकात दिली.
मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनास शाळेचे 2 हजार विद्यार्थी, शिक्षक, पालक, उपस्थित होते. विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. त्यास पालकांनी व श्रोते वर्गाने विशेष दाद दिली .
मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनास शाळेचे 2 हजार विद्यार्थी, शिक्षक, पालक, उपस्थित होते. विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. त्यास पालकांनी व श्रोते वर्गाने विशेष दाद दिली .
यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे व्हाईस चेअरमन श्री रमणलाल दोशी ,ट्रेझरर श्री हेमंत रानडे , सदस्य श्री शिरीष दोशी , श्री नितीन गांधी , श्री शिरीष भोसले , श्री भोजराज नाईक निंबाळकर , श्री शिवाजीराव घोरपडे , प्रशासन अधिकारी श्री अरविंद निकम , प्राचार्य श्री बाबासाहेब गंगवणे , ज्युनिअर चे उपप्राचार्य श्री देशमुख डीएम , पर्यवेक्षक श्री शिंदे व्हि , श्री जाधव गोपाळराव , सौ सुनीता माळवदे , श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम प्री – प्रायमरी स्कूलच्या प्राचार्या नसरीन शेख, श्री जगन्नाथ कापसे, युवा उद्योजक श्री तुषार नाईक निंबाळकर , द गुरु द्रोणा सायन्स अकॅडमी चे व श्रीमंत मालोजीराजे प्रवेश परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक अविनाश नरुटे ,संचालक कोकरे इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते
हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सांस्कृतिक विभागाच्या कु तृप्ती शिंदे सौ वैशाली रसाळ,सौ लतिका अनपट ,सौ बुचडे एल यु ,श्रीमती नीलंबरी मगर ,सौ लोणकर वनिता श्री अनिल यादव श्री बापूराव सूर्यवंशी तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व एन सी सी चे सर्व विद्यार्थी यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे पारपाडला .
सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा शालेय विद्यार्थ्यांनी सांभाळली यामध्ये बालनिवेदिका कु भार्गवी बडवे , कु आर्या साळूंखे , कु. सिल्वी बोबडे त्याचबरोबर संपूर्ण कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन विद्यालयाचे उपशिक्षक श्री रुपचंद बोबडे , सुजित जमदाडे , संदिप पवार यांनी केले.कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीताने झाली .