फलटण टुडे वृतसेवा :-
फलटण तालुक्यातील पवारवाडी, सातारा तालुक्यातील निनाम, कोरेगाव तालुक्यातील एकंबे आणि पाटण तालुक्यातील मारुल हवेली या ४ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राचेदेखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ताथवडा, गुरसाळे, क्षेत्र माहुली, अंगापूर व येळगाव या प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी ६ रुग्णवाहिकांचे चावी देऊन लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी आयआय केअर फाउंडेशन यांनी सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निधी अंतर्गत दिलेल्या १२५ संगणकांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. पालकमंत्री शंभूराज देसाई, इतर मागास व बहुजन मंत्री अतुल सावे, आमदार मकरंद पाटील आदी उपस्थित होते.