फलटण टुडे (बारामती ): –
पुणे भारत स्काऊट गाईड व शिक्षण विभाग जिल्हा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि३१ डिसेंम्बर २०२३ ते ०१ जानेवारी २०२४ दरम्यान भारत स्काऊट गाईड जिल्हा मेळावा पुरदंर येथे आयोजित केला होता.सदर मेळाव्यामध्ये सावळ येथील ज्ञानसागर इंग्लिश मीडियम स्कूल, येथील १८ स्काऊट आणि १० गाईड अशा एकूण २८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
या मेळाव्यामध्ये स्काऊट गाईड विभागा च्या वतीने तंबू सजावट, शेकोटी कार्यक्रम, बिन भांड्याचा स्वयंपाक, शोभायात्रा, संचालन असे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.त्या सर्व स्पर्धांमध्ये विद्यालयातील सहभागी विद्यार्थ्यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी करून आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करून विविध पारितोषिके पटकाविली. संकेत जावरे, महेंद्र देवासी, ओम मदने ओमराज पाटील, आरुष सुरनवर, रामहरी मोहोळकर, विराज शिंदे श्रवण वाघ, अभिराज काटे,
सिद्धार्थ शेलार ,आदित्य कुमावत काळे यशराज, श्रेयश जाधव
राजवर्धन वाळुंजकर ,वेदांत मेरगळ
समाधान शिंदे, प्रेम लोखंडे
केंगारे तनय, मयंक जावरे ,
झगडे श्रेया, झगडे आराध्या ,
वैष्णवी जाधव, कविता चौधरी ,
आर्या शिंदे, श्रुती गाडे ,अक्षया निंबाळकर, हर्षदा खाडे, अनुश्री बंडगर वरील सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष सागर आटोळे, सचिव मानसिंग आटोळे, उपाध्यक्षा रेश्मा गावडे, विश्वस्त पल्लवी सांगळे,दिपक सांगळे, दीपक बिबे, सीईओ संपत जायपत्रे, विभाग प्रमुख गोरख वनवे,मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे, सुधीर सोनवणे , निलिमा देवकाते, राधा नाळे, निलम जगताप, रिनाज शेख यांनी अभिनंदन केले