बारामती नगरपरिषद चा वर्धापन दिन उत्साहात संपन्न वर्धापन दिनानिमित्त स्वछता दूताचा सन्मान

वर्धापन दिनानिमित्त दिव्यांग व्यक्तींना धनादेश देताना मान्यवर व सोबत महेश रोकडे व इतर

फलटण टुडे (बारामती ): –
बारामती नगरपरिषदेचा १५९ वा वर्धापन दिन उत्साहामध्ये आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.
 याप्रसंगी मा.नगरसेवक किरण गुजर, सचिन सातव व मा. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, संध्या बोबडे, भारती मुथा ,मा.नगराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, कैलास चव्हाण, जवाहर वाघोलिकर, मा. उपनगराध्यक्ष विजय खरात, पांडुरंग आटोळे,बाळासाहेब जाधव व इतर मा. नगरसेवक आणि मुख्यधिकारी महेश रोकडे व विविध विभाग प्रमुख अधिकारी व,कर्मचारी आणि विविध संस्थांचे पदाधिकारी नागरिक उपस्तीत होते.

 बारामती नगरपालिकेमधील शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वच्छ सुंदर,पर्यावरण पूरक बारामती व प्लास्टिक मुक्त बारामती यावर प्रातिनिधिक स्वरुपात संस्कार जाधव व संघर्षा पोळ विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट वक्तृत्व कला सादर केली.
 तर म. ए.सो विद्यालय च्या विद्यार्थ्यांनी बाय-बाय प्लास्टिक व के.ए. सी. फौंडेशन च्या विद्यार्थ्यांनी चांद्रयान मोहिम पथनाट्यातून सादर केली.
महिला बचत गटाना फिरता निधी वाटप व गरजू दिव्यांग व्यक्तींना उदरनिर्वाह भत्ता वाटप करण्यात आले. तसेच विविध प्रभागात स्वछता साठी कार्य उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरिकांना स्वछता दूत म्हणून प्रशस्तीपत्रक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. बारामती नगरपरिषद च्या अधिकारी व कर्मचारी यांच्या गुणवंत पाल्याचा सत्कार करण्यात आला.
प्राचीन बारामती व नगरपरिषद चा इतिहास बदल माहिती माधव जोशी व बदलती अत्याधुनिक बारामती बदल प्रा. सलीम बागवान यांनी माहिती दिली.
” शासनाचे विविध पुरस्कार बारामती नगरपरिषद ला नागरिकांच्या सहकार्याने मिळाले असून स्वच्छ ,सुंदर, पर्यावरण पुरक व प्लास्टिक मुक्त बारामती करताना नागरिकांचा प्रतिसाद असून नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे” मुख्यधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले.
सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील तर आभार स्नेहल घाडगे यांनी केले.

चौकट: 
 सर्व माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्या समवेत दीपप्रज्वलन करताना सेवा ज्येष्ठ कर्मचारी (जे कर्मचारी काही महिन्यात सेवानिवृत्त होणार आहेत ) यांना संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले व कायमस्वरूपी सदर वर्धापन दिन स्मरणात राहणार असल्याचे सांगितले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!