अ. भा. गोरेगावकर शाळा विजयी

फलटण टुडे वृत्तसेवा मुंबई दि. २ :-
 दादर येथील अमर हिंद मंडळ, अमर वाडी, गोखले रोड येथे आयोजित आंतरशालेय खो-खो स्पर्धेत अ. भा. गोरेगावकर, गोरेगाव शाळेच्या मुला-मुलींच्या संघानी विजय नोंदवले. तर उर्वरित सामनेही एकतर्फी झाले. या स्पर्धेत गोरेगावकर स्कुलची श्रावणी लोखंडे आणि सिध्दार्थ नगरचा सुमित सहानी यांनी एका डावात ७ मिनिटे संरक्षणाचा खेळ केला.
दादर येथील अमर हिंद मंडळ, अमर वाडी, गोखले रोड येथे आयोजित आंतरशालेय खो-खो स्पर्धेत अ. भा. गोरेगावकर, गोरेगाव शाळेने श्री गणेश शाळा वडाळा शाळेचा ११-०८ असा १ डाव ३ गुणांनी मात केली. विजयी संघातर्फे राज दुडये (१.३०, ४.१० मिनिटे संरक्षण व २ गुण), यश दुडये (२.३० मि. संरक्षण व १ गुण), हर्षद शिर्के (२.४० मि. संरक्षण व ४ गुण), शुभम शिंदे (२.१०, २.२० मि. संरक्षण व १ गुण) यांनी चांगला खेळ केला. पराभूत संघातर्फे प्रणय झोरे (४ गुण) व गौरव माप (०.५० मि. संरक्षण) यांनी खेळ केला. दुसऱ्या सामन्यात सिध्दार्थ नगरने १ डाव व १३ गुणांनी एस. व्ही. एस. इंग्लिश स्कुलचा (१३-१) पराभव केला. विजयी संघातर्फे सुमित सहानी (७. मि. नाबाद संरक्षण व १ गुण), सचिन सहानी (५ मि. संरक्षण व ३ गुण), इब्राहिम शेख (२ मि. संरक्षण व ३ गुण) यांनी चांगला खेळ केला. एसव्हीएस तर्फे दक्ष चव्हाणने (१ मि. संरक्षण) एकाकी झुंज दिली. सोशल सर्व्हीसेस स्कुलने शारदाश्रम विंद्यामंदिरचा १ डाव ६ गुणांनी (१०-४) पराभव केला. विजयी संघातर्फे समर्थ परब (६.४० मि. संरक्षण), प्रथमेश टक्के (४.३० मि. संरक्षण), प्रतिक माने (३ गुण) यांनी उत्कृष्ट खेळ केला. निहाल पंडितने (१.४० मि. संरक्षण) शारदाश्रमतर्फे एकाकी झुंज दिली. तिसऱ्या सामन्यात कनोसा हायस्कुलने एसव्हीएस इंग्लिश स्कुलचा (१०-३) १ डाव ७ गुणांनी पराभव केला. कनोसातर्फे मुग्धा देवळेकर (३.५०, ५.५० मि. संरक्षण व १ गुण), श्रिया सिंह (३.१० मि. संरक्षण व १ गुण), पुर्वा महाडिक (५ गुण) यांनी चांगला खेळ केला. डाॅ. डी. बी. कुलकर्णी संघाने (१२-५) सानेगुरूजी विद्यालय संघावर १ डाव ७ गुणांनी मात केली. विजयी संघातर्फे आदर्श ऊके (३.१० मि. संरक्षण व २ गुण), आयुश नवाळे (४ मि. संरक्षण) यांनी चांगला खेळ केला. तर सानेगुरूजीतर्फे विहंग पाटीलने (१.५० मि., २ मि. संरक्षण व ३ गुण) सर्वोत्कृष्ट खेळ केला. मुली गटात गोरेगावकर स्कुलने डी. बी. कुलकर्णी विद्यालयाचा १ डाव ६ गुणांनी (११-४) असा पराभव केला. त्यात श्रावणी लोखंडे (७ मि. संरक्षण व १ गुण), सिया भद्रिके (४ गुण) यांनी चांगला खेळ केला. कुलकर्णी विद्यालयातर्फे आरूषी पवार (२ मि. संरक्षण), सलोनी पवार (१ मि. संरक्षण) यांनी पराभव वाचवण्यासाठी प्रयत्न केले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!