फलटण टुड (सातारा दि. 2 ): –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दि.3 जानेवारी रोजी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
सकाळी 11 वाजता के.एन.पी पशुवैद्यकीय महाविद्यालय हेलिपॅड, शिरवळ येथे आगमन व मोटारीने नायगाव ता. खंडाळाकडे प्रयाण. 11.15 वाजता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 193 व्या जयंती निमित्त कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ. नायगाव ता. खंडाळा. दुपारी 12 वाजता नायगाव येथून मोटारीने श्रीपतराव कदम महाविद्यालय, शिरवळकडे प्रयाण. 12.15 वाजता स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ. श्रीपतराव कदम महाविद्यालय, शिरवळ. दुपारी 1.15 वाजता मोटारीने के.एन.पी. पशुवैद्यकीय महाविद्यालय हेलिपॅडकडे प्रयाण. 1.20 वाजता हेलिकॉप्टरने राजभवन हेलिपॅड, मुंबईकडे प्रयाण.