फलटण टुडे वृत्तसेव दि. 02 :-
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्त क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले जयंती उत्सव समिती व फुले प्रेमी यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर व नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन बुधवार दि. ३ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९.०० ते सायं. ५.०० वा. पर्यंत. करण्यात येणारे आहे
महात्मा फुले चौक, फलटण येथे सकाळी १०.०० ते दु.२.०० वा.पर्यंत नेत्र तपासणी करण्यात येणार आहे तर रक्तदान सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० वा. पर्यंत केले जाणार आहे यावेळी रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले जयंती उत्सव समिती मार्फत आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमाची सुखात उद्या बुधवार दिनांक ०३ जानेवारी २०२४ राजी सकाळी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करून होईल. या कार्यक्रमासाठी व सर्वांनी सकाळी ९.०० वा. महात्मा फुले चौक, फलटण येथे उपस्थित रहावे ही अशी विनंती.क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले जयंती उत्सव समिती कडून करण्यात आली आहे