फलटण टुडे ( बारामती ):
श्रीपतराव मार्तंड माडकर (वय८१) यांचे शुक्रवारी २९ डिसेंबर रोजी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली ,सुना, नातवंडे, असा मोठा परिवार आहे. दैनिक रोखठोकचे संपादक सुरेश माडकर यांचे ते वडील होत सुरवडी, फलटण परिसरात अध्यात्मिक क्षेत्रात त्यांचा सहभाग होता . त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे