फलटण टुडे (सातारा दि.29) : –
जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचे/योगदानाचे मुल्यमापन होऊन, त्याचा गौरव व्हावा त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत जिल्हा क्रीडा पुरस्कार वितरित करण्यात येतो. जिल्हा क्रीडा पुरस्कारांतर्गत ०१ गुणवंत क्रीडा मार्गदर्शक व गुणवंत खेळाडू ०३ (०१ महिला, ०१ पुरुष, ०१ दिव्यांग खेळाडू या प्रमाणे पुरस्कार प्रदान करण्यात येत असून, पुरस्कार्थीना प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व रुपये १०,०००/- रोख रक्कम देण्यात येते. जिल्हा क्रीडा पुरस्काराकरिता खालील निकष पूर्ण करणारे व्यक्ती पात्र ठरतील.
महाराष्ट्रात सलग १५ वर्षे वास्तव्य असणे आवश्यक आहे. क्रीडा मार्गदर्शक म्हणून सतत दहा वर्षे महाराष्ट्रात क्रीडा मार्गदर्शनाचे कार्य केले असले पाहिजे व त्याने वयाची ३५ वर्षे पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. गुणांकनाकरिता या जिल्ह्यातील खेळाडूंचीच कामगिरी ग्राह्य धरण्यात येईल. ३. खेळाडूने पुरस्कार वर्षासह लगतपूर्व ५ वर्षापैकी २ वर्षे त्या जिल्ह्याचे मान्यता प्राप्त खेळांच्या अधिकृत स्पर्धांमध्ये प्रतिनिधीत्व केले असले पाहिजे. ४. एका जिल्ह्यामध्ये जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती राज्यातील अन्य जिल्ह्यामध्ये जिल्हा क्रीडा पुरस्काराकरिता अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. ५. एकदा एका खेळामध्ये किंवा प्रवर्गामध्ये जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त केलेली व्यक्ती पुन्हा त्याच खेळात किंवा प्रवर्गात जिल्हा क्रीडा पुरस्कार मिळण्यास पात्र राहणार नाही. ६. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक १४ डिसेंबर २०२२ मधील परिशिष्ट अ-६.१ मध्ये नमूद एकूण ४४ खेळ जिल्हा क्रीडा पुरस्काराकरिता पात्र असतील.
तरी सातारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडू / क्रीडा मार्गदर्शक यांनी जिल्हा क्रीडा पुरस्काराचे परिपूर्ण अर्ज दिनांक ०५ जानेवारी, २०२४ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा अधिकारी, सातारा येथे सादर करावेत असे आवाहन श्री. नितीन तारळकर, जिल्हा क्रीडा अधिकारी सातारा यांनी केलेले आहे.