*आणि ते विद्यार्थी भेटले बावीस वर्षांनी….*

 

विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक च्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न 

विद्या प्रतिष्ठान च्या स्नेह मेळावा प्रसंगी माजी विद्यार्थी व शिक्षक

फलटण टुडे (बारामती ): – 
बारामती मधील विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळा मधील बॅच १९९९- २००० च्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा २५ डीसेंबर रोजी विद्या प्रतिष्ठान मध्ये संपन्न झाला.
या प्रसंगी सौ साठे संगीता , यादव प्रकाश हिवरकर अर्जुन, रकटे नानासाहेब , घोरपडे अजिनाथ ,कुंभार प्रकाश , मोहिते धनाजी , मोटे संदीप, शिंपी प्रमोद , राजेंद्र लोणकर ,दत्तात्रय बबन आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व माजी विद्यार्थी उपस्तीत होते.
‘जरा विसावू या वळणावर ‘ 
या विषयाला अनुसरून कार्यक्रम संपन्न करत असताना 
 शालेय जीवनातील सुखद व दुःखद घटना सांगून जुन्या आठवणींना उजाळा दिला व सद्या नौकरी,व्यवसाय करताना शालेय जीवनातील प्रत्येक अनुभव उपयोगी पडत असल्याने संस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
 विद्यार्थी व शिक्षक नाते दृढ करताना संस्कार व अभ्यास महत्वाचा असल्याचे सांगून सण २००० बॅच च्या विद्यार्थ्यांनी नौकरी, उद्योग,व्यवसाय,खेळ व विविध क्षेत्रात शाळेचे नाव उज्वल केल्याचे प्रा. प्रकाश यादव यांनी सांगितले.
 शालेय जीवनातील आठवण सांगून शिस्त, संस्कार च्या शिदोरी मुळे जीवनात यश असल्याचे प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी सांगितले.  
  शिक्षकांनी सुद्धा सदर वर्गातील मुलांविषयी आपले विचार मांडले .
हा कार्यक्रम यशस्वी होणे साठी ॲड.हरिश कुंभरकर यांच्यासह मेजर अनिल कायगुडे, वैशाली पवार , संतोष मोरे , सविता लोखंडे , शशिकांत चौधर , राणी मोकाशी , रमेश देवकाते , डॅा. विकास कुंभार ,विशाल पवार या माजी विद्यार्थ्यांनी योगदान दिले.
अॅड. हरिश कुंभरकर यांनी स्वागत केले
मनिषा काजळे व विनोद बनकर यांनी सूत्रसंचालन केले
 किशोर खाडे यांनी आभार मानले .

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!