श्रीमंत रामराजे क्रिकेट क्लब फलटणच्या यशराज सुनील मदनेची महाराष्ट्र संघात निवड

श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते सन्मान स्विकारताना यशराज सुनिल मदने

फलटण टुडे (फलटण ):-

वाठार निंबाळकर गावचा सुपुत्र व श्रीमंत रामराजे क्रिकेट क्लब फलटणचा खेळाडून लेगस्पीनर यशराज सुनील मदने याची आंध्र प्रदेश येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अंडर १६ संघात विजय मर्चंट क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली.


श्रीमंत रामराजे क्रिकेट क्लब फलटणचा लेगस्पिनर यशराज सुनिल मदने याने सातारा जिल्हा संघाकडून खेळताना सातारा संघाचे अंडर – १६ संघाचे तसेच MCA BLUE चे कर्णधारपद भूषवत महाराष्ट्र राज्य आमंत्रित क्रिकेट स्पर्धेत ५० विकेटस् मिळवल्या तसेच अंडर १९ स्पर्धेत देखील २१ विकेट्स मिळवत एकाच सिजनमध्ये एकूण ७१ विकेटस् मिळवत आंध्र प्रदेश येथे झालेल्या
महाराष्ट्र राज्य अंडर – १६ विजय मर्चंट क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र क्रिकेट संघात दिमाखात पदार्पण केले

मागील १० वर्षापासून यशराज श्री. इस्माईल शेख सर, श्री. मिलिंद सहस्त्रबुध्दे सर तसेच श्री. सोमनाथ चौधरी सर, श्री. मिलिंद चौधरी
सर यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे. त्याने २०२१-२२ मध्ये अंडर -१४ मध्ये देखील ३ सामन्यांमध्ये १० विकेटस् आणि १५० धावा बनवून खूप जबरदस्त अष्टपैलू कामगिरी केली
होती.

तसेच त्याला द्रोणाचार्य पुरस्कार विजेते मुंबईचे सुप्रसिद्ध प्रशिक्षक श्री. दिनेश लाड सर यांचे मार्गदर्शनही वेळोवळी भेटत असते. BCCI
चे व्हिडिओ एनेलायझर श्री सदानंद प्रधान यांचे आशिर्वाद कायम यशराजच्या पाठीशी असतात.

या यशाबद्दल विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यशराजचा यथोचित सन्मान केला व त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .

यावेळी श्रीमंत रामराजे क्रिकेट ॲकॅडमीचे अॅड. मिलिंद सहस्रबुद्धे सोमनाथ चौधरी वअन्य मान्यवर उपस्थित होते

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!