माहाराष्ट्र हॉकी संघात निवड झालेल्या १४ वर्षा खालील मूली डावीकडन कु. वेदिका वाघमोरे , सिद्ध केंजळ , मानसी पवार , गायत्री खरात
फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि २९ ):-
मध्यप्रदेश मधील ग्वाल्हेर येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय हॉकी स्पर्धेमध्ये १४ वर्षाखालील महाराष्ट्राच्या मुलींचा संघ या स्पर्धेसाठी सहभागी होणार आहे. यामध्ये मुधोजी हायस्कूल च्या ४ मुलींची निवड झाली आहे .
या स्पर्धेमध्ये मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या कु.वेदिका वाघमोरे ची महाराष्ट्र संघाची कर्णधारपदी निवड करण्यात आली असून. इस्लामपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेमध्ये वेदिका वाघमोरेची स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली होती. तसेच मुधोजी हायस्कूलच्या सिद्धी केंजळे, गायत्री खरात व मानसी पवार या तीन खेळाडूंचा महाराष्ट्राच्या संघामध्ये समावेश करण्यात आला आहे.
या स्पर्धा 28 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीमध्ये ग्वाल्हेर येथे संपन्न होणार आहेत. या यशस्वी खेळाडूंना महाराष्ट्राचे जेष्ठ हॉकी कोच तथा तालुका क्रीडाधिकारी (नि.) महेश खुटाळे , मुधोजी हायस्कूल ज्युनिअर कॉलेज चे क्रीडा मार्गदर्शक एन आय एस कोच सचिन धुमाळ , टिम मॅनेजर बंडू खुरंगे , क्रीडा मार्गदर्शक शिक्षिका धनश्री क्षिरसागर व वरिष्ठ खेळाडू यांचे मोलाचे मार्गदर्शक लाभले .
महाराष्ट्राच्या हॉकी संघा मध्ये निवड झालेल्या खेळाडूंचे व क्रीडा मार्गदर्शक शिक्षक यांचे विधान परिषदेचे विद्यमान आमदार मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर , फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार मा. श्री दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर , महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर , क्रीडा समितीचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे , प्रशासनाधिकारी अरविंद निकम, प्राचार्य बाबासाहेब गंगवणे,ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य देशमूख ज्ञानदेव पर्यवेक्षक शिंदे व्ही. जी., जाधव जी.ए., पर्यवेक्षिका सौ. सुनिता माळवदे , क्रीडा समितीचे सर्व सदस्य व फलटण एज्युकेशन सोसायटीचे नियामक मंडळ सदस्य , शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य ,फलटणकर हॉकी प्रेमींनी आजी – माजी खेळाडू व मान्यवरांनी अभिनंदन केले व पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या .