फलटण टुडे (फलटण):-
फलटण एज्युकेशन सोसायटीच्य मुधोजी महाविद्यालयाचा हॉकी खेळाडू कु.भावेश रायते याची शिवाजी विद्यापीठ हॉकी संघामध्ये निवड झाली असून. पश्चिम विभागीय अंतर विद्यापीठ हॉकी स्पर्धा या रवींद्रनाथ टागोर विद्यापीठ,भोपाळ मध्यप्रदेश येथे संपन्न होणार आहेत.
निवड झालेल्या खेळाडूचे व प्रशिक्षक यांचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,संस्थेचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम ,मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एच.कदम सर यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.