फलटण टुडे (बारामती ): –
विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी व अभ्यासाची एकाग्रता वाढवून गुणांमध्ये रूपांतर होणे साठी लडकत सायन्स अकॅडमी बारामती ने इयत्ता १० वीत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता ११ वी ( विज्ञान ) नीट ,जेईई, सीईटी (NEET/JEE /MHT-CET) प्रवेशासाठी लडकत शिष्यवृत्ती २०२४ परीक्षेचे आयोजन रविवार दि. २४ डिसेंबर रोजी आयोजन केले होते.नोंदणीकृत व सरळ प्रवेश मार्फत
राज्यभरातून एक हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
सी.बी.एस.सी तसेच स्टेट बोर्ड विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र परीक्षा घेण्यात आली ,या परीक्षेद्वारे विद्यार्थांना ११ वी/ नीट, जेईई व सी ई टी (NEET/JEE/MHT-CET) इत्यादी स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारी साठीच्या प्रवेशा करिता रुपये दोन लाख पर्यंत स्कॉलरशिप दिली जाणार आहे. येत्या डिसेंबर २८ तारखेला या परीक्षेचा निकाल घोषित केला जाणार आहे . तसेच या परीक्षेचा दुसरा टप्पा दिनांक १४ जानेवारी २०२४ रोजी आयोजित केला जाईल.फक्त परीक्षेसाठी अभ्यास न करता या स्पर्धेच्या युगात प्रत्येक विद्यार्थ्यानी शिकवलेला विषय योग्य आकलन करून समजून घेऊन अभ्यास केला पाहिजे,आर्टिफिशियल इंटेलिजन्स,सायबर सेकुरिटी ,इत्यादी फील्ड मध्ये नवनवीन संधी उपलब्ध आहेत त्यासाठी सुद्धा लडकत अकॅडमी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करत आहे.
दर्जात्मक व गुणवत्तापूर्ण शिक्षण देताना विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी शिक्षण देताना शिष्यवृत्ती चा लाभ घ्यावा व
१४ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या लडकत स्कॉलरशिप परीक्षेच्या दुसऱ्या भागा मध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन लडकत सायन्स अकॅडमी चे संचालक नामदेव लडकत यांनी केले.
—————————–