तेलुगू योद्धासने उडवला राजस्थान वॉरियर्सचा धुव्वा ओडिशा जगरनॉट्सने केला मुंबई खिलाडीसचा निसटता पराभव

राहुल मंडल व रोहन शिंगाडेला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार 
फलटण टुडे (भुवनेश्वर, २७ डिसेंबर ): –
अल्टीमेट खो-खो चा सीझन दोन कटक येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियमवर सुर आहे. खो खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने अमित बर्मन यांनी सुरु केलेली ल्टीमेट खो खो पहिल्या सीझनमध्ये जबरदस्त हिट ठरली होती जी भारतातील तिसरी सर्वात मोठी टेलिव्हिजन प्रेक्षकसंख्येच्या दृष्टीने बिगर क्रिकेट स्पर्धा म्हणून उदयास आली. अल्टीमेट खो-खो हि पहिली स्पर्धा आहे ज्या स्पर्धेला यूके स्थित बीएनपी ग्रुपने निधीची उपलब्धता करून दिली आहे. अल्टीमेट खो-खो चे सर्व सामने दररोज सायंकाळी ७.३० पासून सोनी स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेल व सोनी लीव अॅपवर थेट पहाता येतील. आजच्या पहिल्या सामन्यात तेलुगू योद्धासने उडवला राजस्थान वॉरियर्सचा १० गुणांनी धुव्वा उडवत विजय साजरा केला तर दुसऱ्या सामन्यात ओडिशा जगरनॉट्सने मुंबई खिलाडीसचा ३ गुणांनी पराभव केला. तर या सामन्यांमध्ये राहुल मंडल व रोहन शिंगाडेला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरविले.  

कालपर्यंत झालेल्या सहाव्या सामन्यांपर्यंत चेन्नई क्विक गन्सचा रामजी कस्यप ४.५२ मि. संरक्षण व २२ गुणांसह संरक्षण व आक्रमणात अल्टीमेट खो-खो सीझन २ सध्या प्रथम क्रमांकावर आहे तर तेलुगू योद्धासचा प्रतिक वाईकर वजीर म्हणून १८ गुणांसह प्रथम क्रमांकावर आहे. तसेच आकाषीय सूर मारण्यात रामजी कश्यप (६ वेळा), स्तंभात खेळाडू बाद करणे प्रतिक वाईकर (४ वेळा), सहज स्पर्शाने बाद करण्यात गजानन शेंगाळ (१४ गुण), सूर मारून बाद करण्यात प्रतिक वाईकर (१४ गुण) सध्या वरच्या क्रमांकावर आहेत.    

आज झालेल्या सातव्या सामन्यात तेलुगू योद्धासने राजस्थान वॉरियर्सचा ३८ – २८ (मध्यंतर २०-१३) असा १० गुणांनी धुव्वा उडवला. राजस्थान वॉरियर्सने नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षण घेतले. राजस्थानच्या पहिल्या तुकडीने ३.०८ मि. संरक्षण करत कडवी लढत दिली व ड्रीम रन्सचा १ गुण वसूल केला. दुसरी तुकडी जवळजवळ पावणे दोन मिनिटात बाद झाली. तर तिसरी तुकडी जवल्जल दीड मिनिटात बाद झाली. या टर्न मध्ये तेलगु योध्दासने ५ आकाशीय सूर मारत एकूण १८ गण असूल केले. सामन्याच्या दुसऱ्या टर्नमध्ये तेलुगू योद्धासच्या पहिल्या तुकडीने जवळजवळ ३.२४ मि. संरक्षण करत ड्रीम रन्सचा १ गुण वसूल केला. दुसरी तुकडीने सुध्दा तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ संरक्षण करत ड्रीम रन्सचा आणखी १ गुण वसूल केला. या डावात ७ गुणांची बढत तेलुगू योद्धासने मिळवली. 

मध्यंतरा नंतर राजस्थान वॉरियर्सची पहिली तुकडी पावणे दोन मिनिटाच्या आत ढेर झाली. तर दुसरी तुकडी सुध्दा पावणे दोन मिनिटाच्या आत बाद झाली तर तिसरी तुकडीने तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ संरक्षण करत ड्रीम रन्सचा १ गुण वसूल केला. या टर्न मध्ये तेलुगू योद्धास आक्रमकांनी ३ आकाशीय सूर मारत एकूण १८ गुण असूल केले. शेवटच्या व ४ थ्या टर्न मध्ये तेलुगू योद्धासच्या पहिली तुकडी जवळजवळ पावणे तीन मिनिटात बाद झाली. दुसरी तुकडी सुध्दा जवळजवळ पावणे तीन मिनिटात बाद झाली. तर तिसरी तुकडीने कडवी लढत दिली. मात्र या सामन्यात सुरवाती पासूनच राजस्थान वॉरियर्सला आपली छाप पाडता आली नाही. या सामन्यात सौरभ आडावकरला उत्कृष्ट आक्रमकाचा तर आदित्य गणपुलेला उत्कृष्ट संरक्षकाचा व राहुल मंडलला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.  

आज झालेल्या आठव्या सामन्यात ओडिशा जगरनॉट्सने मुंबई खिलाडीसचा ३१ – २८ (मध्यंतर १४-१५) असा ३ गुणांनी निसटता पराभव केला. या सामन्यात मुंबई खिलाडीस विरुध्द ओडिशा जगरनॉट्सने नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षण घेतले. ओडिशा जगरनॉट्सची पहिली तुकडी अडीच मिनिटांच्या आत बाद झाली. दुसरी तुकडी सव्वा दोन मिनिटात बाद झाली तर तिसऱ्या तुकडीतील एकच खेळाडू बाद झाला. या सामन्यात गजानन शेंगाळने उत्कृष्ट खेळ केला. या टर्न मध्ये मुंबईच्या आक्रमकांनी ४ आकाशीय सूर मारत एकूण १४ गुण मिळवले. सामन्यातील दुसऱ्या टर्न मध्ये मुंबई खिलाडीस च्या पहिल्या तुकडीने ३.२० मि. संरक्षण करत कडवी लढत तर दिलीच शिवाय ड्रीम रन्सचा १ गुण वसूल केला. दुसऱ्या तुकडीने २.२० मि. संरक्षण केले या टर्न मध्ये दीपक साहूने उत्कृष्ट आक्रमण केले तर हृषिकेश मुर्चावडे उत्कृष्ट संरक्षण केले. मध्यंतराला मुंबई खिलाडीसने ओडिशा जगरनॉट्सवर १५–१४ अशी नाममात्र १ गुणाची आघाडी घेतली होती. 

मध्यंतरा नंतर ओडिशा जगरनॉट्सची पहिली तुकडीने ३.११ मि. संरक्षण केले व ड्रीम रन्सचा १ गुण वसूल केला. दुसरी तुकडी दोन मिनिटात बाद झाली या वेळी अनिकेत पोटेने आक्रमणात दोन गडी बाद केले. या टर्न मध्ये मुंबईने १२ गुण मिळवले. शेवटच्या व ४ थ्या टर्न मध्ये मुंबई खिलाडीसची पहिली तुकडी पावणेदोन मिनिटात बाद झाली व सामना हातातून सुटत गेला. दुसऱ्या तुकडीने तीन मिनिटांपेक्षा जास्त खेळ केल्याने ड्रीम रन्सचा १ गुण वसूल केला या वेळी सागर पोतदारने चांगले संरक्षण केले. मात्र पुढची तुकडी मोठा करिष्मा करू न शकल्याने मुंबई खिलाडीसला पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात दीपक साहूला उत्कृष्ट आक्रमकाचा, हृषिकेश मुर्चावडेला उत्कृष्ट संरक्षकाचा व रोहन शिंगाडेला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. 

शुक्रवारी पहिला सामना राजस्थान वॉरियर्स व चेन्नई क्विक गन्स यांच्यात तर दुसरा सामना गुजरात जायंट्स व तेलुगू योद्धास यांच्यात रंगणार आहेत.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!