फलटण बस स्थानकावर सालाबाद प्रमाणे दि.२६ रोजी श्री दत्त जयंती ऊत्साहात साजरी करण्यात आली.
श्री दत्त जयंती निमित्त सकाळी स्थानक प्रमुख राहुल वाघमोडे यांचे हस्ते सपत्नीक महाअभिषेक संपन्न झाला. दुपारी १२ ते २ श्री जिवनदास एकतारी भजनी मंडळ,वाठार निंबाळकर याचां सुश्राव्य असा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
दुपारी ४ ते ६ युवा किर्तनकार ह.भ.प.श्री. राहुल महाराज मासाळ यांचे जन्मकाळाचे सुश्राव्य असे किर्तन संपन्न झाले. सायं ६ वाजता श्री दत्त जन्मकाळ ,पाळणा संपन्न होऊन आगार व्यवस्थापक रोहित नाईक,स्थानक प्रमुख राहुल वाघमोडे,सहाय्यक वाहतुक निरीक्षक धिरज अहिवळे,सुखदेव अहिवळे ,ऊस्तव समीती अध्यक्ष सुनिल बोंद्रे,संजय टाकळे,माऊली कदम,सच्चिदानंद शेलार ,महेश गोसावी यांचे ऊपस्थीतीत आरती संपन्न होऊन सर्वाना सुंटवडा वाटप करण्यात आला.
बुधवार दि.२७ रोजी दुपारी १२ वाजता श्री चीं आरती संपन्न होऊन महाप्रसाद भंडारा संपन्न झाला. सर्व कार्यक्रमासाठी भावीक भक्त,प्रवाशी व कर्मचारी बंधु-भगीणी यांची बहुसंख्येने ऊपस्थीती होती. प्रतीवर्षी कर्मचारी बंधु भगीणी,अधिकारी याच्यां सहकार्याने व देणगी तुन महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. फलटण शहरातील असंख्य भावीक श्री दत्त दर्शनासाठी गुरुवारी तसेच श्री दत्त जयंती कार्यक्रमात ऊत्साहाने सहभागी होत असतात.यावेळी अयोध्ये वरुन आलेल्या अभीमंञित कलशाचे श्री दत्त मंदिरात आगमन झाले,सर्व भावीकांनी जय श्रीराम च्या घोषात मंगल कलशाचे दर्शन घेतले .ऊत्सव संपन्न होण्यासाठी फलटण आगारातील कर्मचारी,अधिकारी,प्रवाशी यांचे बहुमोल सहकार्य लाभले !