फलटण टुडे वृत्तसेवा ( मुंबई, २५ डिसेंबर ) : –
गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रूग्णांमध्ये वाढ होताना दिसताय. अशातच कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 ने देखील देशात हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 628 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले आहेत. 24 डिसेंबरपर्यंत देशात कोरोनाच्या JN.1 प्रकाराची एकूण 63 प्रकरणे समोर आल्याची माहिती मिळतेय. तर यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कोरोनाची पॅनिक होण्यासारखी परिस्थिती नाहीये, मात्र काळजी घेण्याची स्थिती आहे. या सगळ्या परिस्थितीकडे आम्ही लक्ष देऊन आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. कुठल्याही प्रकारचा सामना करायला आपण तयार आहोत. मात्र आपण अपेक्षा करू की त्याचा फार प्रादुर्भाव वाढणार नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.