सातारा शहराअंतर्गत वाहतुकीत बदल

फलटण टुडे (सातारा, दि.22 ) : –
सातारा शहरातील पोवई नाका ते एस.टी.स्टँड जाणारे सार्वजनीक रोडवर व एस.टी. स्टँड इनगेट समोर वाहतुकीची कोंडी होत असलेने राधिका सिग्नल,एस.टी.स्टँड इनगेट,आऊटगेट व शाहु स्टेडिअम गेट दरम्यान वाहतुकीचे व्यवस्थेत बदल करणे अत्यावश्यक आहे.पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३४ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारान्वये 25 डिसेंबरच्या रोजीचे २३:५५ वा.पासुन पुढील आदेश होईपर्यंत खालीलप्रमाणे वाहतुकीत बदल केले आहे.

 .

पोवई नाका मार्गे एस.टी.स्टैंड बाजुकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने यांना एस.टी.स्टँड इनगेट व एस.टी.स्टँड आऊटगेट येथुन उजवीकडे वळण घेण्यास बंदी करणेत येत आहे. राधिका सिग्नल चौकातुन एस.टी.स्टँड बाजुकडे जाणारी सर्व वाहने यांना एस.टी. स्टँड इनगेट व एस.टी.स्टँड आऊटगेट येथुन उजवीकडे वळण घेणेस बंदी करणेत येत आहे. बसस्थानकातून आऊटगेट मधुन बाहेर पडणा-या सर्व एस.टी.बसेस यांना उजवीकडे वळणेस बंदी करणेत येत आहे.

राधिका चौक व मनाली कॉर्नर जोडणारा मार्केट यार्ड मधील रस्त्यावर दोन्ही बाजुस वाहने पार्किंग होवून वाहतुकीची कोंडी होत असल्याने सदरचा रस्ता हा नो पार्किंग झोन म्हणुन जाहीर करणेत येत आहे.

वाहतुकीकरीता पर्यायी मार्ग-

पोवई नाका मार्गे एस.टी.स्टँडकडे जाणा-या सर्व एस.टी.बसेस भुविकास चौक येथे सर्कलला वळण घेवून एस.टी.स्टँड इनगेट मधुन बसस्थानकात प्रवेश करतील.तसेच पोवई नाका, राधिका रस्त्यावरुन येणारी सर्व प्रकारची वाहने ही भूविकास चौक येथे सर्कलला वळण घेवून शाहू स्टेडियम, एस.टी. स्टँड मार्गे पोवई नाका व पारंगे चौकाकडे प्रवेश करतील. बसस्थानकातून आऊटगेट मधुन मेढा,महाबळेश्वर, वाई,मुंबई,पुणे बाजुकडे बाहेर पडणा-या सर्व एस.टी.बसेस पोवई नाका दिशेने तहसिल कार्यालय-जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पोवई नाका- जी.एस.टी.भवन-पारंगे चौक-जुना आर.टी.ओ.चौक मार्गे भूविकास चौक तसेच वाढे फाटा बाजुकडे जातील. तरी या बदलाची सर्व नागरिकांनी नोंद घेवुन पोलीस दलास सहकार्य करावे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!