फलटण टुडे ( फलटण दि 22 ) :-
फफलटण एज्युकेशन सोसायटीचे अभियांत्रिकी महाविद्यालय, फलटण येथील व्हाँलीबाँल या खेळातील खेळाडू यांचे डाँ.बाबासाहेब आंबेडकर तंञशास्ञ विद्यापीठ, लोणेरे जि. रायगड अंतर्गत कोल्हापूर विभागीय व्हाँलीबाँल स्पर्धेतून महाविद्यालयाची कु. आदिती राऊत, कु. माया पोकळे ,आणि कु. स्वप्नील सञे यांची निवड दि.27 डिसेंबर 2023 रोजी होणाऱ्या डाँ.बाबासाहेब आंबेडकर तंञशास्ञ विद्यापीठ, लोणेरे जि. रायगड आंतर विभागीय राज्यस्तरीय व्हाँलीबाँल स्पर्धेसाठी झालेली आहे . सदर खेळाडू यांना शारीरिक शिक्षण संचालक प्रा. शेंडगे टी. एम. यांचे मार्गदर्शन लाभले. या निवड झालेल्या खेळाडूंचे जिल्ह्याचे नेते व फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटणचे अध्यक्ष आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, संस्थेचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, संस्थेचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फ.ए.सोसायटीचे सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य आणि फ.ए.सोसायटीचे प्रशासन अधिकारी श्री.अरविंद निकम, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाँ.एन.जी.नार्वे , महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.