महिला इनडोअर क्रिकेट निवड चाचणी स्पर्धा के. व्ही. क्लबचा एम. पी. शहा क्लबवर ५० धावांनी विजय

फलटण टुडे (मुंबई, क्री. प्र.) : –
महाइनडोअर क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने महामुंबई इनडोअर क्रिकेट स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे महिला इनडोअर क्रिकेट निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन अर्बन स्पोर्ट्स टर्फ, पार्क क्लब, केळुस्कर मार्ग, छ. शिवाजी महाराज मैदानाजवळ, दादर (प.) मुंबई येथे केले होते. या स्पर्धेला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेत अंतिम सामन्यात के. व्ही. क्लबने एम. पी. शहा क्लबवर विजय साजरा करत स्पर्धेचे जेतेपद मिळवले.

अंतिम सामन्यात के. व्ही. क्लबने एम. पी. शहा क्लबवर ५० धावांनी विजय साजरा केला. या सामन्यात के. व्ही. क्लबने प्रथम फलंदाजी करताना १६ षटकात ११९ धावा केल्या तर एम. पी. शहा क्लबने १६ षटकात ६९ धावाच करता आल्या. पहिल्या चार षटकात के. व्ही. क्लबच्या समृद्धीने (१४ धावा), सुनंदाने (२५ धावा) धावा चोपत अवांतर धावांसह धावफलकावर ४२ धावा लावत संघाला एक आश्वासक सुरवात करून दिली. त्यांनतर आलेल्या के. आर्या व उषाने पुढच्या चार षटकात निराशजनक कामगिरी करताना वजा २१ धावा झाल्याने संघाला २१ धावांचे नुकसान झाले. त्यनंतर आलेल्या एस. आर्याने (१९ धावा) व सईने चार षटकात २७ धावांची भर घातली. शेवटच्या चौथ्या जोडीने आर. शेजलने (३८ धावा, २ षटकार, १ चौकार ) व बी. परेराने (३३ धावा, ३ षटकार, १ चौकार ) जोरदार खेळी करताना अवांतर धावांसह शेवटच्या चार षटकात ७१ धावांची भर घातल्याने संघाला धावफलकावर ११९ धावा लावता आल्या.


एम. पी. शहा क्लबने फलंदाजीला सुरवात केल्यावर पी. अयेराम व मेघाने पहिल्या चार षटकात फक्त ५ धावाच करू शकल्या. दुसऱ्या चार षटकात पिंकी (१६ धावा) व तन्वीने (१४ धावा) यांनी अवांतर धावांसह ३१ धावा फलकावर लावल्या. त्यानंतर आलेल्या लक्ष्मी (९ धावा) व उर्वशीने (१६ धावा) यांनी अवांतर धावांसह ३१ धावा फलकावर लावल्या व शेवटच्या जोडीतील रिया व कोमलने शेवटच्या चार षटकात ६ धावा फलकावर लावल्या त्यमुळे संघाला ६९ धावा फलकावर लावल्या. त्यामुळे के. व्ही. क्लबला ५० धावांनी विजय मिळवता आला.

स्पर्धेचे उद्घाटन माजी क्रिकेट खेळाडू व पार्क क्लबच्या अध्यक्षा वरदा चुरी यांच्या हस्ते पार पडले. तर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मा. दत्तात्रय वेदक (माजी अध्यक्ष, मुंबई महिला क्रिकेट असोसिएशन), माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू वृंदा भगत, वैशाली भिडे बर्वे (माझी कर्णधार महिला मुंबई क्रिकेट असोसिएशन), माजी क्रिकेट खेळाडू रूपाली ठाकूर यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी महा इनडोअर क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन क्षितीज वेदक, सचिव बाळ तोरसकर आधी उपस्थित होते.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!