केरळमध्ये कोरोनाच्या नवीन व्हेरियंटची एन्ट्री; दोघांच्या मृत्यूनंतर प्रशासन अलर्ट मोडवर
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना; 10 वर्षात तुमचे पैसे होतील दुप्पट
ओव्हरथिंकींग दूर करण्यासाठी ही मुद्रा करा, काही दिवसातच फायदे दिसून येतील
केरळमध्ये कोरोनाच्या नवीन व्हेरियंटची एन्ट्री; दोघांच्या मृत्यूनंतर प्रशासन अलर्ट मोडवर
देश
कोरोनाने पुन्हा जोर पकडला, एका दिवसात आढळले 335 नवीन रुग्ण
कोरोनापासून बचावासाठी आतापर्यंत 220.67 कोटी लसी देण्यात आल्या आहेत.
थंडीचा मोसम आल्यापाठोपाठ देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. सरत्या चोवीस तासात 335 लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून रविवारी देण्यात आली. यापाठोपाठ सक्रिय रुग्णांची संख्या देखील वाढून 1701 वर गेली आहे.
आरोग्य मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू पावलेल्यांची संख्या 5 लाख 33 हजार 316 इतकी आहे. तर रिकव्हरी दर 98.81 टक्के इतका आहे. कोरोनापासून बचावासाठी आतापर्यंत 220.67 कोटी लसी देण्यात आल्या आहेत.
भारतातील JN.1 उप प्रकारांची स्थिती –
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, केरळमध्ये 13 डिसेंबर रोजी नवीन कोरोना व्हायरस JN.1 प्रकार आढळून आला. भारतीय SARS-CoV-2 Genomics Consortium (INSACOG) च्या नवीन डेटाने देखील केरळमध्ये त्याची उपस्थिती उघड केली आहे. नॅशनल इंडियन मेडिकल असोसिएशन कोविड टास्क फोर्सचे सह-अध्यक्ष डॉ. राजीव जयदेवन म्हणाले की, भारतात कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. त्यात JN.1 देखील असू शकतो.
लक्षणे काय आहेत?
सीडीसीच्या म्हणण्यानुसार, सध्या हे माहित नाही की कोविड -19 JN.1 मध्ये इतर प्रकारांपेक्षा वेगळी लक्षणे आहेत की नाही. सध्या लक्षणे सारखीच मानली जातात. यामध्ये ताप, सततचा खोकला, लवकर थकवा, नाक बंद पडणे, नाक वाहणे, जुलाब, डोकेदुखी यांसारखी लक्षणे दिसू शकतात