*
फलटण टुडे (सातारा ):-
सातारा जिल्हा अँथलेटिक्स असोसिएशन आयोजित श्री. महालक्ष्मी विद्यालय व ज्युनिअर काँलेज,मोही ता. माण या ठिकाणी दि.10 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या सातारा जिल्हा वार्षिक मैदानी ( क्राँसकंट्री) स्पर्धेत *फलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालय, म्हसवडच्या*
*कु.अजिनाथ प्रकाश शिंगाडे* याने 20 वर्षाखालील गटात 6 कि. मी. धावणे या प्रकारात सुवर्ण पदक मिळविले. तसेच *कु. रुपाली आबाजी सावंत* हिने 20 वर्षाखालील गटात कास्यंपद मिळविले. दोन्ही खेळाडू यांचे बुलढाणा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्राँसकंट्री स्पर्धेसाठी निवड झाली आहे . या खेळांडूना शारीरिक शिक्षण संचालक प्रा. शेंडगे टी. एम. व सहाय्यक मार्गदर्शक श्री . बापूराव कोळेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
या विजयी खेळाडूंचे जिल्ह्याचे नेते व फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटणचे अध्यक्ष आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, संस्थेचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत मालोजीराजे सहकारी बॅंकेचे चेअरमन व संस्थेचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फ.ए.सोसायटीचे सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य आणि फ.ए.सोसायटीचे प्रशासन अधिकारी श्री.अरविंद निकम, महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ.एस.टी. कदम , महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.