३३ वी राष्ट्रीय किशोर-किशोरी खो-खो स्पर्धा

फलटण टुडे (टिपटूर ,कर्नाटक) क्री. प्र.: –
खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने आणि कर्नाटक खो-खो असोसिएशन आयोजित ३३ वी राष्ट्रीय किशोर-किशोरी खो-खो स्पर्धा कल्पतरू क्रीडांगण टीपटूर, जिल्हा टुमकूर (कर्नाटक) येथे सुरु आहे. या स्पर्धेत तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी साखळी सामन्यात विजय मिळवत गटात अव्वल कामगिरी साधली. किशोरी गटात उत्तरप्रदेशचा तर किशोर गटात उत्तराखंडचा पराभव केला.

टीपटूर येथील कल्पतरू मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत किशोरी गटात महाराष्ट्रने उत्तरप्रदेशचा ३४-१४ असा एक डाव २० गुणांनी पराभव करत गटात अव्वल कामगिरी केली. महाराष्ट्र संघातर्फे मैथिली पवार (१.३० मिं. संरक्षण व ८ गुण), स्नेहा लोमकाणे (२.४० मिनिटे संरक्षण), वैष्णवी चाफे (२.५० मिं. संरक्षण), अक्षरा डोळे (१.१० मिं. संरक्षण व ४ गुण), मुग्धा विर (२.५० मिं. संरक्षण) तर रिध्दी चव्हाण (१.२० मिं. नाबाद संरक्षण व २ गुण) यांनी चांगला खेळ करत महाराष्ट्राचा विजय सोपा केला. उत्तरप्रदेशतर्फे संजना भारद्वाज (२ मिं. संरक्षण व २ गुण), अनु प्रग्या (४ गुण) यांनी चांगला खेळ केला.

किशोर गटात महाराष्ट्रने उत्तराखंडचा ४४-१४ असा एक डाव ३० गुणांनी पराभव केला. विजयी संघातर्फे ओंकार सावंत (२.३० मिं. संरक्षण व २ गुण), भीमसिंग वसावे (२ मिं., १.३० मिं. संरक्षण व ६ गुण), हारद्या वसावे (२ मिं. संरक्षण व ८ गुण), आदेश पाटील (१.३० मिं. संरक्षण व गुण ८) यांनी केलेल्या उत्कृष्ट खेळ केल्यामुळे विजय सोपा झाला. पराभूत संघातर्फे कुणाल आर्या (२ गुण) याने चांगला खेळ केला.

किशोरी गटात उर्वरित सामन्यात कोल्हापूरने विदर्भ संघावर एक डाव १८ गुणांनी (२८-१०) मात केली. वेस्ट बंगाल संघाने पाँडेचेरीचा एक डाव ४ गुणाने (१८-१४) अशी मात केली. तामिळनाडूने छत्तीसगडचा एक डाव १० गुणांनी (२६-१६) असा पराभव केला. केरळने गुजरातचा एक डाव २ गुणांनी (२२-२०) पराभव केला.

किशोर गटात उर्वरीत सामन्यात कोल्हापूरने पाँडेचेरीचा एक डाव ४ गुणांनी (१८-१४) असा पराभव केला. मध्यभारतने चंदीगडचा एक डाव १० गुणांनी (२२-१२) तर छत्तीसगडने उत्तरप्रदेशचा २ गुणांनी (२८-२६) मात केली
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!