फलटण टुडे (बारामती ): –
बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील शिवम विश्वनाथ धेंडे यांची भूमीहीन शेतकरी कामगार संघ महाराष्ट्र राज्याच्या बारामती तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
दिवसेंदिवस शेतीचे प्रमाण कमी होत आहे कुटुंबाची संख्या वाढत असताना कुटूंबातील सदस्य म्हणजेच शेतकरी भूमिहीन होत आहे त्याच प्रमाणे शेतीला निसर्ग साथ देत नाही व कर्जबाजारी पणा आदी कारणाने भूमिहीन शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. आशा सर्वाना एकत्र आणून त्यांना शासनाच्या माध्यमातून सहकार्य मिळवून देण्यासाठी नोकरी, उद्योग ,व्यवसाय मध्ये स्थान मिळवून देण्यासाठी भूमिहीन शेतकरी कामगार संघाच्या माध्यमातून कार्यरत राहणार असल्याचे शिवम विश्वनाथ झेंडे यांनी निवड झाल्यानंतर सांगितले
निवडीचे पत्र संस्थापक अध्यक्ष नानासाहेब रणदिवे व पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख ज्ञानदेव खिलारे व युवा उद्योजक हरी आटोळे आदी मान्यवर उपस्थित होते.